Bailpar river Dainik Gomantak
गोवा

बैलपार नदीवर पंप हाऊसचे काम बंद करण्याची मागणी

कासारवर्णे पंचायतीची नोटीस; जन आंदोलनाचा इशारा

दैनिक गोमन्तक

पेडणे: कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील बैलपार नदी शेजारी जलसिंचन खात्यामार्फत 27 कोटी रुपये खर्च करून पंप हाउस बांधण्याचे बांधकाम युद्ध पातळीवर चालू आहे. ते बांधकाम बेकायदा असल्याचा दावा करत पंचायतीने संबंधित खात्याला काम बंद ठेवण्यासाठी नोटीस पाठवली.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या बांधकामाचा शुभारंभ सरपंच रमेश पालयेकर यांच्या उपस्थिती उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. आता तेच सरपंच हे बांधकाम बेकायदा ठरवून बंद करण्यासाठी नोटीस पाठवत आहेत. त्याबद्दल नागरिक संभ्रमात पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूने शनिवारपर्यंत हे बांधकाम बंद केले नाही, तर या विरोधात धरणे आंदोलन धरण्याचा इशारा मोपा पंचक्रोशी पिडीत जन संघटनेने दिला आहे.

पावसाळ्यात बैलपार नदीला महापूर येतो, त्यात भर पडते, ती तिळारीचे पाणी भरल्यानंतर सोडले जाते, त्या दिवशी तर पूर्ण बैलपार पूल परिसरातील घरांना धोका संभवत असतो. मुख्य रस्ते पाण्याखाली जातात. लोकांचा संपर्क तुटतो. काही लोकांना पूरग्रस्त भागातून हलवावे लागते. बैलपार नदीवर जो जुना बंधारा आहे. तेथे वाहून येणारी लाकडे अडकतात आणि पाणी वाट मिळेल, तसे ते मुख्य रस्त्यावर येते. तो बंधारा काढावा, अशी मागणी स्थानिकांनी निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे केली होती. नदी किनारी 27 कोटी रुपये खर्च करून पंप हाउस उभारण्याचे काम सुरू झाले.

शेतकऱ्यांचे उपोषण मागे!

बैलपार-कासारवर्णे येथील प्रकल्पाबाबत 28 रोजी जलसोत्र खात्याच्या अभियंते स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. शेतकरी व ग्रामस्थांची या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आज हे उपोषण सुरु केले होते. या उपोषणात उदय महाले, बाबूराव गाड व कुटुंबीय, सागर गाड तसेच गावातील पुरूष व महिलांनी या उपोषण आंदोलनात भाग घेतला. सोमवारी अभियंत्यासोबतच्या चर्चेनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आंदोलन कर्त्यानी सांगितले..

पुलाच्या कठड्यांना धोका

या कामामुळे बैलपार पुलाच्या कठड्याना धोका निर्माण झाला असून, ठीक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या दाबामुळे पुलाला हानी संभवते. हा धोक्या लक्षात घेऊन संबंधितांनी हा प्रकल्प बंद करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT