Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: पर्यावरणीय आघात मूल्यांकन अहवाल खोटा

Goa Mining Case: ग्रामसभेत पडसाद : अडवलपाल खाण ब्लॉक जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: खाणीच्या विषयावरून डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची (रविवारी) ग्रामसभा तापली. अडवलपाल खाण ब्लॉकअंतर्गत तयार केलेला ‘ईआयए’ (पर्यावरणीय आघात मूल्यांकन) अहवाल खोटा आणि गाव उद्ध्वस्त करणारा आहे,

असा दावा करत ग्रामस्थांनी खाणीसाठी जनसुनावणी घेण्यास प्रखर विरोध केला. ही जनसुनावणी रद्द करा, अशी जोरदार मागणी आज ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली.

तसा ठरावही ग्रामसभेत घेतला. मार्च महिन्याच्या १५ तारखेला अडवलपाल खाण ब्लॉकसाठी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. खाण परिक्षेत्रात येणारी घरे-दारे, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक जलस्रोत लीज क्षेत्रातून बाहेर काढावीत, अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली.

गाव उद्ध्वस्त करणारा खाण व्यवसाय आम्हाला नकोच, अशी भूमिका काही ग्रामस्थांनी मांडली. सरपंच गजानन पालकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेस अन्य पंचसदस्य उपस्थित होते.

‘ते’ खटले मागे घ्या!

बेकायदा खाण व्यवसायाला विरोध केल्यामुळे १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ यावर्षी तत्कालीन खाण कंपनीकडून स्थानिक ७० लोकांविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला अजून न्यायप्रविष्ट आहे. हा मुद्दा आजच्या ग्रामसभेत पुन्हा उपस्थित झाला. ग्रामस्थांच्या विरोधातील खटले मागे घ्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

जलस्रोतांवर संकट

खाण व्यवसायामुळे गावातील जलस्रोत नामशेष झाली आहेत. खाणमाती घुसल्याने शेती-बागायती धोक्यात आली आहेत. बंदीपूर्वी सुरू असलेल्या खाण व्यवसायामुळे लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुढील ५० वर्षांसाठी खाण व्यवसाय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.

आधी गावातील समस्या सोडवा

गावाच्या भवितव्याचा विचार करून आणि खाण व्यवसायामुळे जनतेला भोगाव्या लागणाऱ्या संभाव्य परिणामांची अगोदर दखल घ्यावी. गावातील समस्या आणि प्रश्न अगोदरच सोडवावेत. त्यानंतर गावात खाण व्यावसाय सुरू करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आनंद गाड, प्रेमनाथ साळगावकर, सुरेश गावकर, विलास नाईक, नेताजी गावकर आदींनी चर्चेत भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

SCROLL FOR NEXT