Deltin Caravela casino
Deltin Caravela casino Dainik Gomantak
गोवा

‘डेल्टिन काराव्हेला’चे व्यवहार अखेर सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी: मांडवी नदीपात्रातील तरंगते हॉटेल व कसिनो डेल्टिन काराव्हेला जहाजामधील सर्व व्यवहार बंद करण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देत आज प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. या आदेशामुळे डेल्टीन काराव्हेला कसिनोच्या व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे.

डेल्टिन काराव्हेलाला सीआरझेड क्लिअरन्सअभावी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) सर्व व्यवहार त्वरित बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्यात आली होती. सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने आदेशाला अंतरिम स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. ही याचिका मागे घेण्यात यावी अथवा ती फेटाळण्यात येईल, असे स्पष्ट केल्यावर ती मागे घेतली होती. त्यानंतर कंपनीने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका सरन्यायाधीशांसमोर ६ मे रोजी सुनावणीस आली. मात्र, त्यावेळी कोणतीही स्थगिती न देता ती एका आठवड्याने पुन्हा सुनावणीसाठी ठेवण्याचे निर्देश रजिस्ट्रीला दिले.

आताच ‘सीआरझेड क्लिअरन्स’ का?

2001 पासून या मांडवी नदीपात्रात उभ्या केलेल्या या जहाजामध्ये कॅसिनोचा व्यवहार सुरू आहे. इतक्या वर्षांनी या कंपनीकडे सीआरझेड क्लिअरन्स नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कॅसिनोचा व्यवहार बंद करण्याचा दिलेला आदेश अवैध व बेकायदा आहे.

...म्हणून कॅसिनोचे व्यवहार बंद

एनजीटीने दिलेल्या या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी किमान दोन आठवड्यांची मुदत देऊन हा आदेश स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, ती फेटाळल्याने डेल्टीन काराव्हेला जहाजावरील कॅसिनो व्यवहार बंद ठेवावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Netravali: कथित शिकार प्रकरणी कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; महामंडळ दोन दिवसांत घेणार कारवाईचा निर्णय

New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT