Shraddha Walkar Murder Case Dainik Gomantak
गोवा

Delhi Murder Case : दिल्ली हत्याकांडाचं गोवा कनेक्शन; श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबची दुसऱ्या मुलीसह गोव्यात मौजमजा

पेशाने फुड ब्लॉगर आणि फोटोग्राफर आफताब पुनावाला याने जून-जुलैमध्ये कळंगुटमधील एका नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केलं होतं.

गोमन्तक डिजिटल टीम

Delhi Murder Case : साऱ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. आरोपी आफताब याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर गोव्यात येत दुसऱ्या एका मुलीसोबत मौजमजा केल्याचं आता तपासात उघड झालं आहे. पेशाने फुड ब्लॉगर आणि फोटोग्राफर आफताब पुनावाला याने जून-जुलैमध्ये कळंगुटमधील एका नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केलं होतं.

आफताब आपल्या इस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून बड्या रेस्टॉरंट्स आणि खाण्याच्या दुकानांची जाहिरात करायचा. यासाठी तो 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत पैसेही आकारत होता. त्याचे 8 ते 10 क्लाएंटही असल्याचं तपासात उघड झालं आहे. आफताबसोबत गोव्यात कोणती तरुणी आली होती याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली नसली तरीही दोघांची ओळख ऑनलाईन झाल्याचं समोर आलं आहे.

आपली लिव्ह इन रिलेशनशिपमधील गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या करुन तिचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब ऑनलाईन डेटिंग अॅप्सचा वापर करत वेगवेगळ्या तरुणींसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार तेव्हा घडायचा जेव्हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे आफताबच्या घरातील फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. गोव्यात आफताबसोबत आलेली मुलगी नेमकी कोण? ती त्याची प्रेयसी होती की त्याने तिला पैसे देऊन सेक्ससाठी गोव्यात आणलं होतं याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

आफताबचे अनेक महिलांशी आणि कॉल गर्लशी संबंध होते. क्लाएंट्सकडून पैसे मिळताच आफताब कॉल गर्ल आणि सेक्स वर्कर्सना कॉल करुन त्यांच्यासोबत मौजमजा करायचा अशी माहिती दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर तो सातत्याने सेक्स वर्करना बोलावत असल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे. जूनमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना पहिल्यांदा सेक्स वर्करसोबत आफताबने त्याच खोलीत संबंध प्रस्थापित केले होते.

यानंतर आफताबने गोव्यात येत कळंगुटमधील एका नामांकित रेस्टॉरंटच्या मालकाशी ऑनलाईन प्रमोशनबद्दल चर्चाही केली होती. वागातोरमधील एका प्रसिद्ध क्लबलाही आफताबने भेट दिली होती. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये त्याने अनेकवेळा ऑनलाईन अॅपवरुन कॉलगर्ल्सना बोलावलं होतं. पोलिसांनी आफताबचे ऑनलाईन ट्रान्झक्शन आणि पेमेंटचाही तपास सुरु केला आहे, ज्यात वेगवेगळ्या अॅपवर यूपीआयच्या माध्यमातून आफताबने पैसे दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT