गोव्याचा डंका जगभर ज्या कार्यक्रमाने पिटला जातो, त्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पैसे खर्च करुन ही तिकीट मिळत नसल्याने आज प्रेक्षकांनी आयोजकांकडे तक्रारीचा सुर आळवला. पैसे खर्च करुन यायचे आणि आपल्याकडून तिकीटच मिळत नसेल तर आम्ही पैसे खर्च का करावेत? या प्रेक्षकाच्या सवालाने काही वेळ आयोजक देखील निशब्द झाले होते.
(delegates complained to the organizers as they could not get tickets for the masterclass in IFFI)
गोव्यात 20 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या इफ्फीसाठी सिनेरसिकांसाठी नोंदणीची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. यासाठी पैसे आकारात प्रवेश निश्चित केले जातात. मात्र असे करुन ही वारंवार मास्टरक्लाससाठी तिकीट उपलब्ध होत नसल्याने प्रेक्षकांनी आज थेट आयोजकांना गाठले अन् आपल्या तक्रारीचा पाढा वाचला. त्यामुळे काही वेळ काय उत्तर द्यावे हे आयोजकांना देखील समजले नाही. मात्र थोड्या वेळाने नेमके काय दुरुस्ती करावी लागेल याचा आम्ही विचार करु असे आयोजकांनी म्हटले आहे.
दहा हजार प्रतिनिधींनी केली नोंदणी
यंदाच्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दहा हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यात केवळ 40 परदेशी प्रतिनिधी असून, यावर्षी 10,000 सिनेरसिकांनी नोंदणी केली असून, ही आजवरची विक्रमी नोंदणी आहे. यामुळे इफ्फीच्या दुसऱ्याच दिवशी (दि.21) नोंदणी बंद करण्यात आली आहे. तसेच, अपुऱ्या स्क्रीनमुळे सिनेरसिकांची गैरसोय झाली आहे.
...अन्यथा अनिष्ठ परिणामांना समोरे जावे लागेल
आता नवी समस्या म्हणजे मास्टरक्लाससाठी तिकीट मिळत नाही. यामुळे आयोजक अन् प्रेक्षक यांच्यात काही वेळ जुंपल्याचे चित्र होते. या तक्रारींकडे आयोजकांनी गांभिर्याने वेळीच लक्ष देत निराकारण करणे आवश्यक आहे. अन्यथा यंदा केवळ 40 परदेशी प्रतिनिधी असून आले. भविष्यात ते आणखी विरळ होतील. अन् याचा अनिष्ठ परिणाम येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.