IFFI 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

54 IFFI 2023: 54 व्या इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू

54 IFFI 2023: 10 हजारापर्यंत नोंदणी: 20 ते 28 नोव्हेंबरमध्ये होणार महोत्सव

दैनिक गोमन्तक

54 IFFI 2023: पणजीत होणाऱ्या 54 व्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि फिल्म बाजारसाठी (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या इफ्फीसाठी 6 हजार 774 प्रतिनिधींनी नोंदणी केली होती. यंदा ती 10 हजार पर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे आयोजित केला जाणारा भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राजधानी पणजीसह राज्यातल्या इतर काही ठिकाणी होईल. या महोत्सवासाठीच्या आणि या महोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या फिल्म बाजारसाठीच्या प्रतिनिधी नाव नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे.

ही प्रतिनिधी आणि फिल्म बाझार साठीची नोंदणी इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणीसाठी चित्रपट व्यावसायिक तसेच रसिकांसाठी 1,180 रुपये शुल्क असणार आहे.

फिल्म बाझार विभागात सहभागी व्हायचे असल्यास विविध विभागासाठी 18 ते 21 हजार रुपये शुल्क आहे. तर विद्यार्थ्यांना हा महोत्सव मोफत पाहता येणार आहे. अशी माहिती एनएफडीसी आणि स्थानिक आयोजक गोवा मनोरंजन सोसायटीच्या वतीने देण्यात आली आहे

यंदा मडगाव येथील रवींद्र भवनात काही निवडक चित्रपट दाखवले जाण्याची शक्यता आहे. महोत्सवाच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात 26 फिचर आणि 23 ते 25 नॉन फिचर चित्रपटांचा समावेश असेल.

गोवा विभागासाठी प्रवेशिका

इफ्फीमधील गोवा विभागासाठी गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) प्रवेशिका खुल्या केल्या आहेत. यात कोकणी आणि मराठी भाषेतील फीचर तसेच नॉन फीचर चित्रपट दाखवण्यात येतील. नॉन फीचर विभागातील चित्रपट इंग्रजी आणि हिंदीत असेल तरीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

मात्र दोन्ही प्रकारच्या चित्रपटांचा निर्माता गोमंतकीय असणे आवश्यक आहे.अर्ज ईएसजीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर आहे. या विभागात चार होऊन जास्त प्रवेशिका आल्या तरच चित्रपट दाखवले जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT