म्हापसा: यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने आणि अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने गोव्यातील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. आगामी खरीप हंगामाचे भवितव्य पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरात एकत्र येत भरघोस आणि वेळेवर पाऊस पडावा यासाठी विशेष प्रार्थना केली.
राज्यातील शेती मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असल्याने पावसाच्या विलंबाचा थेट परिणाम शेतीकामांवर होत आहे. पेरणीची कामे रखडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अशा परिस्थितीत निसर्गाची कृपा लाभावी आणि शेतीला पोषक वातावरण निर्माण व्हावे, या भावनेतून शेतकऱ्यांनी बोडगेश्वराच्या चरणी साकडे घातले.
यावेळी शेतकऱ्यांनी यंदाचा हंगाम यशस्वी होण्यासाठी, पिकांना पुरेसा पाऊस मिळावा आणि शेतीसमोरील संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे कृषी क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या आव्हानांवरही उपस्थितांनी चिंता व्यक्त केली.
...पाऊस येईल!
या विशेष प्रार्थना कार्यक्रमास संजय बर्डे, शंकर पोळजी, दिपेश नाईक, कायतान, रामदास शिरोडकर, शीतेश मोरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. बोडगेश्वराच्या कृपेने लवकरच मान्सून सक्रिय होऊन शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.