Degree Students Marksheet Delay Dainik Gomantak
गोवा

निकाल लागला, पण पदवी अजूनही रखडली; महाविद्यालयांच्या चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, कला शाखेचे 2 हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

Degree Students Marksheet Delay: राज्यातील विविध महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होऊनही कला शाखेच्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील विविध महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होऊनही कला शाखेच्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र मिळालेले नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत आवश्यक फॉरमॅटमध्ये गुण सादर करण्यात काही महाविद्यालयांनी हलगर्जीपणा केल्याने हा घोळ निर्माण झाला असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

यासंदर्भात, गोवा विद्यापीठाला संबंधित विद्यार्थ्यांचे गुण पुन्हा तपासून गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे तयार करावी लागत आहेत. गुणपत्रिकेत अथवा प्रमाणपत्रात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अतिरिक्त काळजी घेतली निकाल लागला पण पदवी रखडली जात असल्याचे गोवा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक समीर पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. मात्र, पीईएस महाविद्यालय, फोंडा येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे काम अद्याप प्रलंबित आहे.

प्रवेशासाठी तात्पुरती गुणपत्रिका

गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अथवा पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही. अशा विद्यार्थ्यांनी गोवा विद्यापीठाकडे अर्ज केल्यास त्यांना तात्पुरती गुणपत्रिका दिली जाईल, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे समीर पाटील यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT