Mather Murder Case Dainik Gomantak
गोवा

Mather Murder Case: मेथर हत्‍याप्रकरणी तिसऱ्यांदा जामीन फेटाळला

गोव्यात (Goa) दिवसाढवळ्‍या हल्ला करून जिवंत माणसाला (Vilas Mather) जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता.

दैनिक गोमन्तक

पर्वरी : तोर्डा येथील विलास मेथर (Vilas Mather) हत्याप्रकरणातील (Mather Murder Case) मुख्य संशयित अल्ताफ यारगट्टी याचा जमीन फेटाळण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात (Goa Court) याबाबत आज सुनावणी झाली असता मुख्‍य संशयित यारगट्टी याचा जमीन अर्ज फेटाळण्यास आला. त्याचा जमीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळण्यास आला. (Defendant's bail denied for third time in Methar murder case)

तोर्डा - पर्वरी येथील विलास मेथर यांच्यावर 14 ऑक्टोबर 2020 रोजी पेट्रोलमिश्रित द्रव्य टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असता त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात दिवसाढवळ्‍या हल्ला करून जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता. त्यामुळे हे प्रकरण बरेच गाजले होते.

या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित बिल्डर अल्ताफ यारगट्टी आणि खय्याज शेख या दोघांना सावंतवाडी येथे अटक केले होते. या प्रकरणी संशयितांना ३ नोव्हेंबर 2020 रोजी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 14 जानेवारी 2021 रोजी या प्रकरणात गुंतलेल्या सातही संशयितांविरोधात भा.दं.सं.कलम 302 आणि 120 ‘ब’ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते.

या आरोपपत्रात 71 लोकांच्या साक्षी नोंदविल्‍या होत्या. त्यानंतर संशयित यारगट्टी याने न्यायालयात दुसऱ्यांदा जमीन अर्ज दाखल केला होता. तोही न्यायालयाने 9 एप्रिल रोजी फेटाळला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज दाखल केला. पण, उच्च न्यायालयाने यावेळी त्याचा जमीनअर्ज फेटाळून लावल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT