Naval War College at Goa Dainik Gomantak
गोवा

Naval War College Goa: लष्कर, वायुसेना आणि नौदल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणास मदत, INS मांडवी येथे 'चोल'चे होणार उद्घाटन

Naval War College Goa: चोल राजवटीची सागरी शक्ती लक्षात घेऊन या आधुनिक वास्तूला चोल असे नाव देण्यात आले आहे.

Pramod Yadav

Naval War College at Goa

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 5 मार्च रोजी पणजी जवळील INS मांडवी, वेरे येथे नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. नौदलाच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे.

संस्थेचे कमांडंट रिअर ॲडमिरल अर्जुन देव नायर यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

या इमारतीमुळे महाविद्यालयाला तिन्ही सेवांच्या (लष्कर, वायुसेना आणि नौदल) अधिकाऱ्यांना आताच्या तुलनेत तिप्पट अधिक प्रशिक्षण देण्यास मदत होईल, असे अर्जुन देव नायर म्हणाले.

चोल राजवटीची सागरी शक्ती लक्षात घेऊन या आधुनिक वास्तूला चोल असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 5 मार्च रोजी नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय संस्थेचे माजी कमांडंट देखील या समारंभाला हजेरी लावतील, असे नायर म्हणाले.

नवीन इमारतीच्या उद्घाटनानंतर पुढील पाच ते दहा वर्षांत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या महाविद्यालयाच्या क्षमतेत तीन पटीने वाढ होणार असल्याचे नायर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT