Goa Job Fraud Canva
गोवा

Cash For Job Scam प्रकरणाचा वेगाने तपास! दीपश्री, सागर यांना पोलिस कोठडी; कारवायांची होणार पोलखोल

Goa Crime: पैसे द्या, नोकरी घ्या’ या प्रकरणातील मास्टरमाईंड दीपश्री सावंत गावस हिला दोन दिवसांची तर सागर नाईक याला एका दिवसाची पोलिस कोठडी न्‍यायालयाने सुनावली. दरम्‍यान, फोंडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग देताना दीपश्री सावंत हिच्या मालकीची पाच वाहने ताब्यात घेतली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam

फोंडा: ‘पैसे द्या, नोकरी घ्या’ या प्रकरणातील मास्टरमाईंड दीपश्री सावंत गावस हिला दोन दिवसांची तर सागर नाईक याला एका दिवसाची पोलिस कोठडी न्‍यायालयाने सुनावली. दरम्‍यान, फोंडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग देताना दीपश्री सावंत हिच्या मालकीची पाच वाहने ताब्यात घेतली आहेत. त्यात तीन कारगाड्या आणि दोन दुचाक्यांचा समावेश आहे. गेल्या २०२१ पासून दीपश्री या बेकायदा नोकरी देण्याच्या व्यवसायात असून तिने आत्तापर्यंत कितीजणांना फसवले आहे,

याचा तपास पोलिस करत आहेत. गावकरवाडा-उसगाव येथील एका महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने तिची १५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरवातीला सागर नाईक याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सुनीता पावसकर व नंतर दीपश्री सावंत गावस हिचे नाव समोर आले होते. या प्रकरणात सागर व सुनीता हिला अटक केल्याचे समजल्यानंतर दीपश्री फरार झाली होती. काल तिला फोंडा पोलिसांनी अटक केली होती.

भलत्‍याच गुणपत्रिकेवर मिळविली होती नोकरी

दीपश्रीने दुसऱ्या व्‍यक्तीच्‍या बारावीच्‍या गुणपत्रिकेवर खाडाखोड करून व आपले नाव नोंदवून २००८ मध्ये एका आमदाराच्या मदतीने हस्तोद्योग खात्यात नोकरी मिळवली होती. त्याबाबत तेव्हा कोणाला संशय आला नव्हता. नंतर कुणकुण लागल्याने माहिती हक्क कायद्याअंतर्गत माहिती मागविण्यात आली. त्यातून तिची पोलखोल झाली आणि तिला नोकरी सोडावी लागली होती. तेव्हापासून ती अशा कारवायांमध्‍ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT