MSME industries Dainik Gomantak
गोवा

MSME industries: एमएसएमई उद्योगांच्या संख्येत घट, 5 वर्षांत 156 उद्योग बंद, सरकारच्या प्रयत्नांना अपयश

MSME industries: केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात नमूद केलं आहे की, ५ वर्षांत १५६ उद्योग बंद झालेत.

Sameer Amunekar

पणजी: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) वाढीबाबत सकारात्मक चित्र दिसत असलं, तरी बंद होणाऱ्या उद्योगांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारे गेल्या ५ वर्षांत १,०३,३८६ ‘एमएसएमई’ सुरू झाले असले, तरी याच कालावधीत १५६ उद्योग बंद झाल्याचं समोर आलं आहे.

केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात नमूद केलं आहे की, ५ वर्षांत १५६ उद्योग बंद झालेत. यातील सर्वाधिक उद्योग गेल्या वर्षात बंद झालेत.

या आकडेवारीवरून उद्योग क्षेत्रातील स्थैर्य आणि टिकाऊपणाबाबत नव्यानं विचार करणं गरजेचं असल्याचे संकेत मिळतात. वाढत्या स्पर्धा, आर्थिक अडचणी, बाजारातील बदलत्या गरजा आणि धोरणात्मक निर्णयांमुळे काही उद्योग बंद पडल्याचं पाहायला मिळतंय.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे 'एमएसएमई' उद्योगांना सहाय्य दिलं जात असलं, तरी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे. धोरणात्मक पातळीवर योग्य बदल करून या उद्योगांना अधिक टिकावू करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे.

राज्याच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची असते. हे उद्योग रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या महसुलात वाढ करत असल्यानं केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या उद्योगांच्या वाढीसाठी विशेष धोरणे राबवली आहेत.

केंद्र सरकारच्या उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलद्वारे गोव्यात मागील पाच वर्षांत १,०३,३८६ एमएसएमई उद्योगांची नोंदणी झाली आहे. मात्र, याच कालावधीत १५६ उद्योग बंद पडले असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

विशेष म्हणजे, २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षात एमएसएमई उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज करणाऱ्या गोमंतकीय उद्योजकांची संख्या कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT