Manish Jadhav
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्यासंख्येने गोव्यात दाखल झाले आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेला छोटासा आणि टुमदार गोवा प्रत्येकाला भुरळ पाडतो.
आज (17 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील ग्रामीण जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत.
गोव्यातील निसर्गाच्या सानिध्यातील शांत गावांची सैर तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये नक्की केली पाहिजे.
गोव्यातील संमिश्र संस्कृती गोव्याला समृद्ध करते. इथले गडकिल्ले, फेस्टिव्हल, पोर्तुगिजकालीन चर्च अन् बरचं काही... पर्यटकांना साद घालतात.
गोव्यात येणारा पर्यटक आता गोव्यातील समुद्रकिनारे, पब्स, कॅसिनोमध्ये जाण्यापेक्षा गावांमध्ये रुजलेली गोवन संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करु लागला आहे.
पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांमधून आपल्या व्यस्त कामातून वेळात-वेळ काढून लोक गोव्याची वाट धरतात. गोव्यातील गावांमधील शांतता पर्यटकांना भुरळ पाडते.