Goa Crime News | Decomposed Hand Found in Fatorda Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! फातोर्ड्यात कुजलेल्या अवस्थेतील हात दिसला अन् नागरिकांची उडाली खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल

फातोर्ड्यातील अंबाजी वाड्यावर एक कुजलेल्या अवस्थेतील हात आढळून आला

Kavya Powar

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन नेहमीच सतर्क असते. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फातोर्ड्यातील अंबाजी वाड्यावर एक कुजलेल्या अवस्थेतील हात आढळून आला आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांनी त्वरित पोलिसांना बोलावले असून फातोर्डा पोलीस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या भागातील काहीजण बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. (Decomposed Hand Found in Fatorda)

ज्याअर्थी कुजलेल्या अवस्थेतील एक हात सापडतो याचाच अर्थ कुणाचा तरी मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप तपासाला सुरुवातच केली असून तो हात नेमका कुणाचा आहे किंवा खरंच कुणाचा मृत्यू झाला आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ते म्हणाले की, एकंदरीत पाहता घटना दुसरीकडे कुठेतरी घडली असून श्वानाने हा अर्धा कुजलेला हात आणून रहिवासी भागात टाकला असण्याची शक्यता आहे. तरी पोलीस पथक या घटनेचा शोध घेण्यासाठी कामाला लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Goa Assmbly Live: 'त्यांना' ३ वर्षे तुरुंगात डांबू!

SCROLL FOR NEXT