Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: संचालकांच्या राजीनाम्यांवर लवकरच निर्णय

डेअरीच्या कारभारावर नाराज होऊन त्या दोन्ही संचालकांनी आपापले राजीनामे सादर केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा डेअरीचे संचालक अनुप देसाई व माधव सहकारी या दोघांनीही आपले राजीनामे गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी सुपूर्द केले आहेत. मात्र, हे राजीनामे स्विकृत केलेले नाहीत. राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून त्यावर चर्चा करण्यात येईल आणि नंतरच निर्णय होईल, असे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी सांगितले.

गोवा डेअरीच्या कारभारावर नाराज होऊन या दोन्ही संचालकांनी आपापले राजीनामे सादर केले आहेत. घटलेले दूध उत्पादन, वाढीव दर आणि एकंदरच होणारा खर्च,

घोटाळे यामुळे डेअरीची वाटचाल धोकादायक स्थितीत असून सहा महिने उलटले तरी अजून गोवा डेअरीची स्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. त्यातच अनेक घोटाळेही गोवा डेअरीच्या कार्यकाळात घडले असल्याने गोवा डेअरीचे भवितव्य डळमळीत झाले आहे.

त्यामुळेच गोवा डेअरीच्या संचालक पदावरून पायउतार होणेच योग्य असल्याचा निर्णय या दोन्ही संचालकांनी घेतला असल्याचे समजते. दरम्यान, गोवा डेअरीची संचालक मंडळाची बैठक अद्याप ठरलेली नाही. पुढील आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT