Margao Corporation Dainik Gomantak
गोवा

Margao Corporation : ‘त्या’ कारकुनाविरुद्ध कारवाईचा निर्णय; मडगाव पालिका बैठकीत ठराव

Margao Corporation : १७.५० लाख रुपयांचा गैरवापर

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Corporation :

सासष्टी, फेस्त फेरीतील सोपो गोळा करून १७.५० लाख रुपये परस्पर आपल्या खात्यात जमा करून गैरवापर केल्याप्रकरणी मडगाव नगरपालिकेतील कारकून योगेश शेटकर याच्याविरुद्ध कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचा निर्णय आज मडगाव पालिका मंडळाच्या खास बैठक घेण्यात आला.

या बैठकीत घनश्याम शिरोडकर, पुजा नाईक, सगुण ऊर्फ दादा नायक, राजू नाईक, सदानंद नाईक, महेश आमोणकर, डॉ. सुशांता कुरतरकर उपस्थित होते. सोपो गोळा करण्याची ज्या इतर आठ जणांवर जबाबदारी होती, त्यांना मेमो देण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे. उद्या किंवा मंगळवारी या कारकुनाच्या विरोधात पोलिस तक्रार केली जाईल.

रक्कम वसुल झाली नाही, तर त्याच्या विरोधात न्यायालयात वसुली याचिका सादर केली जाईल, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

ही रक्कम वसुल करण्याला आपण सर्वप्रथम प्राधान्य देत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. ही रक्कम हप्त्याने वसुल करण्यास आपला विरोध असेल, असेही नगराध्यक्षाने सांगितले. या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत हे पूर्ण चौकशी केल्यानंतरच कळेल, पण नगरपालिकेचे प्रशासन कोलमडले आहे हे या घटनेने सिद्ध झाल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

‘त्या’ कारकूनाने तीन लाख केले परत

मडगाव नगरपालिकेतील ज्या कारकूनाने फेस्त फेरीतून ‘सोपो’ गोळा करुन १७.५० लाख रुपये नगरपालिकेऐवजी आपल्या वैयक्तिक खात्यात जमा करून गैरवापर केला. त्या कारकूनाने आज तीन लाख रुपये परत केले आहेत. आता उरलेले १४.५० लाख रुपये वसूल करण्यासाठी पालिकेला कारवाई करावी लागेल.

प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची सूचना

योगेश शेटकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना लिहिलेले एक पत्र कोणी तरी आणून दिले. त्यात त्याने ही रक्कम आपल्या खात्यात जमा केली हे मान्य केले. आपल्याला ही रक्कम भरण्यासाठी वेळ द्यावा व ती हप्त्यांनी भरण्याची परवानगी द्यावी असे म्हटले आहे. यावेळी योगेशकडून कायदेशीर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे अशी सूचना नगरसेवकांनी केली.

बैठकीत उघड झालेले कारनामे

१ योगेश शेटकर याने बनावट सह्या करून बॅंकांना बनावट पगार प्रमाणपत्र देऊन लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे.

२ फेस्त फेरी आयोजनात मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना विश्र्वासात घेतले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेस्त फेरी आयोजनाची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर होती, असे मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण.

३ नगराध्यक्षांच्या माहितीनुसार यंदा २९२ स्टॉल्सना परवाना दिला होता. मात्र, बैठकीत २९९ स्टॉल्सना परवाना दिल्याचे उघड झाले.

४ सोपो गोळा करताना पावतीवर नगरपालिका इन्स्पेक्टरची सही होती. काही पावत्यांवर वादग्रस्त कारकुनाची सही असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

५त्या कारकुनाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला रक्कम गोळा करण्यास सांगितले गेले. मात्र, नेमके कोणी सांगितले तसेच त्याला ही रक्कम गोळा करण्याचे अधिकार कोणी दिले?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

SCROLL FOR NEXT