Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Tourist In Goa: हडफडेतील आग, इंडिगोमुळे पर्यटक असंतुलित! पर्यटनमंत्री खंवटेंचे स्पष्टीकरण; टॅक्सी, खड्डे, मोकाट गुरे याबाबत घेणार बैठक

Rohan Khaunte: इतर काही कारणांमुळे यंदा पर्यटकांत चढ-उतार दिसून आल्‍याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: यंदाच्‍या डिसेंबरमध्‍ये राज्‍यात आलेल्‍या देशी–विदेशी पर्यटकांची संख्‍या संतुलित होती. पण, हडफडेतील रोमियो लेन क्‍लबला लागलेली आग, इंडिगोने विमान फेऱ्यांमध्‍ये केलेली कपात तसेच इतर काही कारणांमुळे यंदा पर्यटकांत चढ-उतार दिसून आल्‍याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

डिसेंबरमध्‍ये राज्‍यात आलेल्‍या एकूण पर्यटकांच्या संख्येबद्दलची आकडेवारी पर्यटन खाते अजूनही जमा करीत आहे. परंतु, गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या यंदा वाढल्‍याने देशी पर्यटकांत वाढ झाल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी टॅक्सी सेवा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांवरील मोकाट गुरे आदींसारख्‍या समस्यांचे निराकरण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्‍याबाबत संबंधितांसोबत लवकरच बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

उड्डाणपूल डिसेंबरपर्यंत कार्यान्‍वित

पर्वरीतील उड्डाणपुलाचे काम येत्‍या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि त्‍यानंतर पूल कार्यान्‍वित होईल, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. या कामासाठी सध्‍या जे रस्‍ते बंद करून वाहने वळवण्‍यात आलेली आहेत, त्‍यामुळे वाहतूक व्‍यवस्‍थेवर किती परिणाम होतो याचा आढावा घेतला जाईल आणि त्‍यावर तोडगा काढण्‍यात येईल, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT