Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्‍यू

Goa Accident News: दाबोळी विमानतळाजवळील ‘ग्रेड सेपरेटर’ उड्डाण पुलावरून दुचाकीने भरधाव वेगाने जाणारे दोघेजण खालील रस्‍त्‍यावर पडून झालेल्‍या भीषण अपघातात दोघांचा मृत्‍यू झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Accident News: दाबोळी विमानतळाजवळील ‘ग्रेड सेपरेटर’ उड्डाण पुलावरून दुचाकीने भरधाव वेगाने जाणारे दोघेजण खालील रस्‍त्‍यावर पडून झालेल्‍या भीषण अपघातात दोघांचा मृत्‍यू झाला. पॅटसन पॅट्रिस रॉड्रिगीस (२४) व प्रज्वल उदया रॉड्रिगीस (२७) अशी त्‍यांची नावे आहेत.

हे दोघेही होन्नावर-कर्नाटक येथील आहेत. अपघात आज बुधवारी दुपारी पावणेदोनच्‍या सुमारास घडला. वास्‍को पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चिखलीमार्गे दाबोळी विमानतळाजवळील ग्रेड सेपरेटर उड्डाणपुलावरून जाताना पॅटसन याचा दुचाकीवरील ताबा सुटला व ती कठड्याला धडकली. त्‍यामुळे दुचाकीवरील दोघेही उड्डाणपुलावरून खाली रस्‍त्‍यावर पडले.

डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्‍याने पॅटसन रॉड्रिगीस हा जागीच ठार झाला, तर गोमेकॉत उपचार सुरू असताना प्रज्वलची प्राणज्‍योत मालवली.पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: मोठी बातमी! गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

SCROLL FOR NEXT