Ganpatipule Whale Fish 
गोवा

गणपतीपुळे समुद्रकिनारी वाहून आलेल्या व्हेलचा मृत्यू, गोव्यातील पथकाने केले शवविच्छेदन

व्हेलच्या मृत्यूचे कारण लवकरच समोर येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Ganpatipule: गणपतीपुळे समुद्रकिनारी वाहून आलेल्या व्हेलचा अखेर मृत्यू झाला. मृत व्हेलचे शवविच्छेदन गोव्यातून गेलेल्या डॉक्टरांच्या पथकाने केले असून, व्हेलच्या मृत्यूचे कारण लवकरच समोर येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मागील तीन दिवसापूर्वा गणपतीपुळे येथील एमटीडीसीसमोरील किनाऱ्यावर व्हेल आढळून आला होता. व्हेलला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. समुद्रात सोडण्यात आलेल्या या व्हेलचा अखेर मृत्यू झाला.

व्हेलला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले होते पण तरी देखील त्याचा मृत्यू कसा झाला? याचा शोध घेण्यासाठी गोव्यातून विशेष डॉक्टरांचे पथक गणपतीपुळे मालगुंड किनारी दाखल झाले. मृत व्हेलचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपासणीसाठी त्याचा व्हिसेरा पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी गणपतीपुळे समुद्रकिनारी व्हेल मासा वाहून आला होता. त्याला पुन्हा समुद्रात पाठवण्यासाठी विविध रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

रत्नागिरी वनविभाग, रेस्क्यू – पुणे, एमटीडीसी, जेएसडब्लू, कोस्ट गार्ड, रत्नागिरी पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिकांनी या बचावकार्यात सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

VIDEO: पाकडे कधीच सुधरणार नाही! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर सॅम अयूबचं वादग्रस्त सेलिब्रेशन; अभिषेक शर्माने दिलं चोख प्रत्युत्तर

Theft Case: शिरदोनमधील 12 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; भारतीय चलनासह डॉलर-पौंड अन् पासपोर्ट जप्त

Baina Flyover Accident: बायणा उड्डाणपुलावर काळाचा घाला; कठड्याला दुचाकीची धडक, 20 फूट खाली कोसळून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT