Death of a married girl with her mother in Canacona incident suspicious Dainik Gomantak
गोवा

काणकोणमध्ये मुलीचा मृत्यू आईचा तपास सुरू, घटना संशयास्पद

ही घटना संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली

दैनिक गोमन्तक

काणकोण : तामने-लोलये येथील आई व विवाहीत कन्या हिचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे. तामने-लोलये येथील आई व विवाहीत कन्या अंकीता पागी हिचा घरा खाली असलेल्या तळ्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिकांनी अंकीता हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढून प्रथोमोपचार करून तोंडातून पाणी बाहेर काढले. मात्र, तिने प्रथोमोचाराला प्रतिसाद दिला नाही. ही घटना संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. अग्नीशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले व तिच्या आईचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, बाळ्ळी येथील एका खासगी मालमत्तेत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्यानंतर आठवडाभरानंतर कुंकळी पोलिसांना तिची ओळख पटवण्यात यश आले आहे. संबंधित महिला कुंकळ्ळी येथील असुन बिट्टी वरक (80) अशी तिची ओळख असल्याचा दावा केला आहे. ती घरातून बेपत्ता झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मुलाने तिचे कपडे आणि बोटाच्या अंगठीच्या आधारे तिची ओळख पटवली.

“महिला जिवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याचे प्राथमिक निदर्शनात दिसून येते, हा अपघात विद्युत शॉकमुळे झाल्याचे समोर येत आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी (Goa Police) सांगितले. काही दिवसांपूर्वी तिला स्थानिकांनी पाहिले होते. मृतदेह (Death Body) शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT