Guirim Mapusa Dainik Gomantak
गोवा

70 वर्षीय वृद्ध घरातून बाहेर पडला, दोन दिवसांनी तळ्यात सापडला मृतदेह; गिरीतील घटनेने खळबळ

वृद्धाने आत्महत्या केली त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला याबाबत काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pramod Yadav

Guirim Mapusa: गिरी, म्हापसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती घरी काहीही न सांगता घरातून बाहेर पडला आणि दोन दिवसांनंतर घराजवळच असणाऱ्या एका तळ्यात त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

वृद्धाने आत्महत्या केली त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला याबाबत काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नारायण मोपकार (वय 70) असे या वृद्ध मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण हे 27 जून रोजी घरातून बाहेर पडले. दरम्यान, ते परत घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी म्हापसा पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता. नारायण यांचा मृतदेह मॉन्ते गिरी येथे एका तळ्यात सापडला आहे.

नारायण यांचा मृतदेह सापडला असून, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू?

70 वर्षीय नारायण मोपकर यांचा मृत्यू कशामुळे झाला ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मोपकर यांनी आत्महत्या केली की त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शवविच्छेदन केल्यानंतर नारायण यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी म्हटल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT