Vasco News  Dainik Gomantak
गोवा

बायणा येथे फ्लॅट बाहेर कचराकुंडीत आढळले मृत अर्भक

मुरगाव पोलीस घटनास्थळी दाखल; परिसरात एकच खळबळ

दैनिक गोमन्तक

वास्को: बायणा येथे कोझी अपार्टमेंट मध्ये तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट बाहेर ठेवलेल्या कचराकुंडीत नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. पालिकेचा नियमित कचरा उचल करणाऱ्या कामगारांना हे बालक दिसताच त्याने त्वरित आपल्या ठेकेदाराला याविषयी माहिती देताच त्याने पोलिसांना कळवले. मूरगाव पोलिस पुढील तपास करीत आहे. (Dead infant found in garbage outside flat at Baina )

धक्कादायक घटनेत बायणा येथे कोझी अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर एका राजस्थानी फ्लॅट धारकाच्या बाहेर ठेवलेल्या कचराकुंडीत एक नवजात अर्भक असलेले घरोघरी कचरा उचलण्यासाठी आलेल्या कामगाराला दिसले. नियमितपणे तो दुपारी बारा वाजता अपार्टमेंटमध्ये कचरा उचलण्यासाठी आला असता तिसऱ्या मजल्यावर एका राजस्थानी समाजाच्या फ्लॅटधारकाचा कचरा उचलण्यासाठी गेला. त्याने कचराकुंडीतील एक प्लास्टिक पिशवी उघडून पाहिली असता त्या पिशवीत एक नवजात अर्भक असल्याच दिसले.

कामगाराने लगेच फ्लॅटची बेल वाजवली. यावेळी नवजात बालक दाखवले व त्या कामगाराने हे बालक कुणाचे असा सवाल केला तिने आम्हाला ठाऊक नसल्याचे सांगितले. यावेळी कामगारांनी आपल्या ठेकेदाराला या विषयी माहीती दिली असता ठेकेदाराने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. मुरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला पोलीस पुढील तपास करत असून पोलिस त्या अर्भकाच्या पालकांचा शोध घेत आहे. पंचनामा केल्यानंतर त्या नवजात बालकाचा मृतदेह मडगाव हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवण्यात आला.

दरम्यान बायणा येथे कोझी अपार्टमेंट मध्ये एका फ्लॅट धारकांच्या कचराकुंडीत नवजात बालक मृत अवस्थेत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली असता तिथे बघ्यांची गर्दी झाली. तसेच अपार्टमेंट मध्ये सर्व जातीचे लोक राहत असून सी टाईप मध्ये असलेल्या गॅलरीतही गर्दी होती. दरम्यान मूरगावचे आमदार आणि वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मूरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

अशा घटनेने लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे ते म्हणाले.वास्को भाजप मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक नाईक यांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांवर गांभीर्याने कारवाई केली पाहिजे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती कोणी करू नये. हे कृत्य मानवते विरुद्ध असल्याचे नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT