Usgao Drowning Dainik Gomantak
गोवा

Usgao Drowning: इतरांना वाचवले मात्र भावाला गमावले; ११ वर्षांच्या दर्शनचा मृतदेह दूधसागर नदीत आढळला

Ponda Drowining Case: तिस्क-उसगाव येथील साईनगरजवळ ओहोळाच्या पाण्यात पाचवीत शिकणारा एक मुलगा बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती आणि आज या लहानग्या मुलाचा मृतदेह अग्निशामक दलाच्या हाती लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तिस्क-उसगाव: बुधवारी ( दि. १६ ऑक्टोबर) रोजी मुसळधार पावसामुळे तिस्क-उसगाव येथील साईनगरजवळ ओहोळाच्या पाण्यात पाचवीत शिकणारा मुलगा दर्शन संतोष गांवकर (वय ११) बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती आणि आज या लहानग्या मुलाचा मृतदेह अग्निशामक दलाच्या हाती लागला आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उसगावातील ओहोळाला पूर आला होता आणि दर्शन यावेळीच बाकी विद्यार्थ्यांसह ट्यूशनमधून घरी परतत असताना ही घटना घडली.

पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या ओहोळाचे पाणी रस्त्यावर आले होते. ओहोळाचे वाढलेले पाणी बघून घाबरलेल्या मुलांनी एकमेकांचा हात धरून ओहोळ ओलांडण्याचा प्रयत्न सुरु केला आणि अचानक हात सुटल्याने दर्शन पाण्याच्या प्रवाहात वाहात गेला.दर्शनच्या बहिणीने प्रसंगावधान राखत इतर दोन मुलांचा जीव वाचवला मात्र दर्शन कुठे आहे अशी चौकशी करताच तो वाहून गेल्याचे सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेची बातमी मिळताच काल रात्री दोन वाजेपर्यंत अग्नीशामक दल व फोंडा पोलिस यांच्याकडून संपूर्ण ओहोळात मुलाचा शोध सुरू होता मात्र त्यांना काही केल्या यश मिळत नव्हते. आज (दि. १७ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस व अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरूच होते आणि सकाळी अग्निशामक दलाचे अधीकारी सुशील मोरजकर यांनी बोटीच्या साहाय्याने दूधसागर खांडेपार नदीत पुन्हा शोध घेतला असता ११च्या सुमारास या लहानग्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.

फोंडा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील हॉस्पिसियो येथे पाठवण्यात आला आहे आणि या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT