Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Dayanad Samajik Suraksha Yojana: समाजकल्याण खात्यातर्फे दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सदर योजना राबविली जाते. महिनाकाठी या योजनेद्वारे कोट्यवधींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.

Sameer Panditrao

पणजी: समाजकल्याण खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्‍या लाभार्थ्यांमध्ये आत्तापर्यंत खात्याने केलेल्या तपासणीत १३ हजार बोगस लाभार्थी सापडले असल्याची माहिती या खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

समाजकल्याण खात्यातर्फे दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सदर योजना राबविली जाते. महिनाकाठी या योजनेद्वारे कोट्यवधींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. परंतु १ लाख ४० हजार लाभार्थ्यांची नोंद झाली असताना खात्याकडे येणाऱ्या नव्या अर्जांचा विचार होत नव्हता.

त्यामुळे लाभार्थींच्या यादीची पडताळणी तथा तपासणी करण्याचे काम खात्याने करण्यास सुरवात केली. त्यातून राज्यभरात १३ हजार लाभार्थी बोगस असल्याचे किंवा ते हयात नसल्याचे किंवा ते राज्य सोडून गेल्याचे, त्याचबरोबर काहींचे या योजनेसाठी निश्चित केलेल्या आर्थिक उत्पनापेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे त्‍यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने राज्य सरकारचे महिनाकाठी अडीच कोटी रुपये वाचणार आहेत.

५० कोटी

या बोगस लाभार्थ्यांकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. सर्वेक्षणात १३ हजार लाभार्थ्यांचे वीजबिल, संबंधित व्यक्तीचा इतर खर्च तपासण्यात आला. त्यातून त्यांचा खर्च दोन हजारांवर अधिक असल्याचे आढळून आले आहे. ‘डीएसएसवाय’ योजनेचे बोगस लाभार्थी कमी झाल्याने आता खात्याकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा त्यात समावेश होण्याची शक्यता आहे. गेली कित्येक महिन्यांपासून या योजनेसाठी नव्याने अर्ज खात्याकडे येत आहेत. विशेष बाब म्हणजे या योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा अनेकांना मोठा हातभार लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT