Davorlim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Davorlim Murder Case: सादिक बेळ्ळारी हत्याकांडातील सातवा आरोपी पोलिसांच्या रडारवर; कर्नाटकात पळून गेल्याचा संशय

सादिक बेळ्ळारी खून प्रकरणातील सातवा संशयित आरोपी गज्जू हा अजूनही फरार आहे

Kavya Powar

Davorlim Murder Case: सादिक बेळ्ळारी खून प्रकरणातील सातवा संशयित आरोपी गज्जू हा अजूनही फरार असून तो पोलिसांना सापडलेला नाही. पोलिस त्याच्या मागावर आहेत. तो कर्नाटकात पळून गेल्याचा संशय असून संशयित वारंवार जागा बदलत आहे.

दरम्यान, या खून प्रकरणात अटक केलेल्या अन्य सहाही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एक सप्टेंबर रोजी रुमडामळ गृहनिर्माण वसाहतीत आपल्या घरात झोपलेल्या सादिकचा निर्घृण खून करण्यात आला होता.

दोन वर्षांपूर्वी भगवती कॉलनी येथे मुजाहिद खानजादे याच्या खुनाचा बदला म्हणून सादिकचा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या खून प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी आत्तापर्यंत कादर खान, तौसिफ कडेमणी, जावेद पानवाले, रेहाल पानवाले, सुलेमान सिंकदर व कबीर खानजादे या सहाजणांना अटक केली.

संशयितांनी सादिकचा खून करण्यासाठी वापरलेले हत्यार पाडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. भादसंच्या ३०२ व १२० (ब) कलमाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT