Davorlim Dicarpale Panchayat, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Davorlim Dicarpale Panchayat: दवर्ली-दिकरपाल पंचायतीवर पहिल्‍यांदाच भाजपचा झेंडा

Goa BJP: पंचायतीच्‍या सरपंचपदी साईश राजाध्‍यक्ष, तर उपसरपंचपदी विद्याधर आर्लेकर यांची आज निवड करण्‍यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नावेली मतदारसंघातील दवर्ली-दिकरपाल पंचायतीवर पहिल्‍यांदाच भाजपचा झेंडा फडकला असून या पंचायतीच्‍या सरपंचपदी साईश राजाध्‍यक्ष, तर उपसरपंचपदी विद्याधर आर्लेकर यांची आज निवड करण्‍यात आली.

राजाध्‍यक्ष यांनी नंतर मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. सावंत यांनी त्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्‍यांच्‍याबरोबर नावेलीचे आमदार उल्‍हास तुयेकर, उपसरपंच विद्याधर आर्लेकर तसेच पंचसदस्‍य संपदा नाईक उपस्‍थित होत्या.

दवर्ली पंचायतीवर भाजपची सत्ता आणल्‍यामुळे मुख्‍यमंत्री सावंत यांनी राजाध्‍यक्ष आणि आर्लेकर यांचे अभिनंदन करताना या पंचायतीच्‍या विकासासाठी सरकार तसेच आपल्‍या कार्यालयातून आवश्‍‍यक ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.

दवर्ली-दिकरपाल पंचायत ही यापूर्वी काँग्रेसधार्जिणी पंचायत म्‍हणून ओळखली जायची. मात्र, आता या पंचायतीवर भाजपचा सरपंच व उपसरपंच निवडून आल्‍यामुळे एक नवीन इतिहास रचला गेला आहे.

स्‍थानिक आमदार उल्‍हास तुयेकर यांच्‍या प्रयत्‍नामुळे ही पंचायत भाजपकडे आली आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच राजाध्‍यक्ष यांनी व्‍यक्‍त केली. सरपंच या नात्‍याने आपण मागील कामे पुढे नेण्‍याबरोबरच पंचायत क्षेत्र कचरामुक्‍त करण्‍यावर भर देणार असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT