Matoli Dainik Gomantak
गोवा

Matoli Competition: माटोळी स्पर्धेत दत्ता नाईक प्रथम

Matoli Competition: कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे निकाल जाहीर

दैनिक गोमन्तक

Matoli Competition: गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने यंदाही गणेश चतुर्थीच्या उत्सवाप्रीत्यर्थ सार्वजनिक गणेश मंडळासाठी राज्यस्तरीय देखावा स्पर्धा घेण्यात आली.

माटोळी स्पर्धेत दत्ता नाईक यांनी प्रथम क्रमांक फटकावला, तर देखावा स्पर्धेत कासावर्णे गणेशोसव मंडळाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

माटोळी सजावट स्पर्धा- यावर्षी माटोळी सजावट स्पर्धेत १३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. माटोळी सजावट स्पर्धेचे २०,०००/- रुपयांचे पहिले बक्षीस दत्ता शंभू नाईक, गावठण प्रियोळ, फोंडा, दुसरे १५,०००/- रुपयांचे बक्षीस श्रीकांत पी. सतरकर, रायत कुर्टी, फोंडा, तिसरे १२,०००/-रुपयांचे बक्षीस तानाजी के. गावडे, तळुले बांदोडा फोंडा, चौथे १०,०००/- रुपयांचे बक्षीस देऊ सत्यवान शेटकर, पिळये धारबांदोडा आणि पाचवे ८,०००/- रुपयांचे बक्षीस रमाकांत दुकळो गावकर, बेतोडा फोंडा यांना प्राप्त झाले.

माटोळी सजावट स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ५,००० /- रुपयांचे बक्षीस विशांत वसंत गावडे, केळबाय कुर्टी-फोंडा, गजानन बांदेकर, वेलवाडा पैगिण-काणकोण, आदेश आनंद नाईक, नावतवाडा बांदोडा-फोंडा, राजन गोपाळ गावडे, पाले-डिचोली आणि खुशाली एन. सतरकर, सावईवेरे फोंडा यांना प्राप्त झाले. राज्य पातळीवरील माटोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजेंद्र पी. केरकर, नागेश सरदेसाई आणि श्रीमती ज्योती कुंकळेकर यांनी काम पाहिले.

उत्तेजनार्थ प्रत्येकी १०,००० /- रुपयांचे बक्षीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, कुस्मणे केपे, कुळे पोलीस स्टेशन, मोपा विमानतळ पोलिस स्टेशन, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हरमल यांना प्राप्त झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

SCROLL FOR NEXT