Goa captain Darshan Misal Dainik Gomantak
गोवा

Premier League Cricket Tournament : दर्शनची फिरकी खेळणे कठीण; सामन्यात 15 विकेट

एमसीसीला विजयासाठी 183 धावांची गरज

किशोर पेटकर

प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत धेंपो क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना मडगाव क्रिकेट क्लबचा (एमसीसी) कर्णधार दर्शन मिसाळ याची डावखुरी फिरकी गोलंदाजी खेळणे खूपच कठीण ठरले. त्याने रविवारी दुसऱ्या डावात आठ गडी टिपत सामन्यात 15 गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सोमवारी एमसीसी संघाला विजयासाठी आणखी 183 धावांची गरज असून त्यांच्या सर्व विकेट शिल्लक आहेत.

दर्शनने दुसऱ्या डावात 78 धावांत 8 गडी टिपले. त्यामुळे धेंपो क्लबचा डाव 2 बाद 134 वरून 205 धावांत संपुष्टात आला. दर्शनने पहिल्या डावात 46 धावांत 7 गडी बाद केले होते. त्याने दोन्ही डावांत मिळून 124 धावांत 15 गडी गारद केले.

धेंपो क्लबचा डावखुरा सलामीवीर मंथन खुटकर याने झुंजार शतक ठोकताना अखेरपर्यंत नाबाद राहत 108 धावा केल्या. त्याने 188 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार मारले. मंथनने दीप कसवणकर याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली.

पहिल्या डावात 19 धावांनी पिछाडीवर पडलेल्या धेंपो क्लबला एकूण 186 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसअखेर एमसीसी संघाने बिनबाद 4 धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 157 व दुसरा डाव : 69.3 षटकांत सर्वबाद 205 (मंथन खुटकर नाबाद 108, दीप कसवणकर 59, यश पोरोब 17, हेरंब परब 1-14, दर्शन मिसाळ 8-78, कीथ पिंटो 1-62)

विरुद्ध मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव (5 बाद 135 वरुन) : 54 षटकांत सर्वबाद 176 (पियुष यादव 44, विकास सिंग 2-62, रोहन बोगाटी 5-67, यश पोरोब 2-22) व दुसरा डाव : 2 षटकांत बिनबाद 4.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT