Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction Controversy: '...तर हिंमत असेल तर दिल्लीवाल्यांची बेकायदा कामं बंद करुन दाखवा', मायकल लोबोंचं मनोज परबांना आव्हान

Michael Lobo Manoj Parab Clash: आमदार मायकल लोबो यांनी, ‘गोमंतकीयांचे कामे बंद करणे सोपे आहे. हिंमत असेल तर दिल्लीवासीयांची बेकायदा कामे बंद करून दाखवा’, असे प्रतिआव्हान दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बेकायदा बांधकामांविरोधात कळंगुट, बागा परिसरात आघाडी उघडलेल्या आमदार मायकल लोबो यांनाच आता अशा कारवाईमुळे प्रतिआव्हानाची भाषा करावी लागली आहे. मायकल यांचे पुत्र डॅनियल यांनी समुद्राच्या बाजूने बेकायदा भिंत बांधण्याचा प्रयत्न केल्यावरून हणजूण-कायसूव पंचायतीने काम बंद करण्याचा आदेश बजावला.

परंतु तक्रार आणि कारवाई एवढ्यापुरते हे प्रकरण आता मर्यादित राहिलेले नाही. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब हे कार्यकर्त्यांसह तेथे गेले आणि त्यांनी या कामाची पाहणी केली आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने पोलिस बंदोबस्तही ठेवावा लागला.

आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी, ‘गोमंतकीयांचे कामे बंद करणे सोपे आहे. हिंमत असेल तर दिल्लीवासीयांची बेकायदा कामे बंद करून दाखवा’, असे प्रतिआव्हान दिले आहे.

आमदार मायकल लोबो यांनी, ‘गोमंतकीयांचे कामे बंद करणे सोपे आहे. हिंमत असेल तर दिल्लीवासीयांची बेकायदा कामे बंद करून दाखवा’, असे प्रतिआव्हान दिले आहे. गोमंतकीयाने गोमंतकीयांकडून घेतलेल्या मालमत्तेत जलसंपदा खात्याच्या परवानगीने भिंत बांधणे गैर नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या साऱ्याची सुरुवात मंगळवारी झाली. स्थानिक युवकांनी मालमत्तेत भिंत बांधण्यासाठी दगडात चाललेली खोदाई बंद पाडली होती. त्यावेळी लोबो यांनी उद्विग्न होऊन सेटिंग करणारे सामाजिक कार्यकर्ते अशी कृत्ये करतात, असा शेरा मारला होता.

प्रत्यक्षात जलसंपदा खात्याची परवानगी असल्याचे भासवून वागातोर येथील किनारी भागात संरक्षक भिंत बांधण्याचा प्रयत्न हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील जागरूक नागरिकांनी हाणून पाडला आहे. स्थानिक पंचायतीने आता काम बंद करण्याचा आदेश डॅनियल लोबो यांना बजावला आहे. पैसे उकळण्यासाठीच असे काम बंद करण्याचे प्रकार काही सामाजिक कार्यकर्ते करत असल्याचा आरोप आमदार लोबो यांनी केल्याच्या २४ तासांतच पंचायतीकडून ही कारवाई केली आहे. हणजूण कायसूव पंचायतीने समुद्रकिनारी सुरू असलेले हे बेकायदा बांधकाम थांबविण्याचा आदेश जारी केला आहे.

ते काम ‘जलसंपदा’च्या परवानगीने

आम्ही हणजुणेत कुठल्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम करत नाही. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेत जलसंपदा खात्याच्या परवानगीने संरक्षक भिंत उभारण्याचे काम करीत होतो. यापूर्वीही हणजूणच्या किनाऱ्यावर खडकाळ भागात रेस्टॉरंटना पाण्याचा तडाखा बसू नये, यासाठी पर्यटन खात्याने संरक्षक भिंती उभारल्या आहेत. सध्या जि.पं. निवडणुका जवळ आल्याने राजकारण डोळ्यांसमोर ठेवून ‘आरजी’चे वैफल्यग्रस्त नेते परब माझ्याविरोधात कुभांड रचत असल्याचा आरोप लोबो यांनी केला.

अन्यथा कायदेशीर कारवाई

वागातोर-हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४१/३ वर सुरू असलेले कथित बेकायदा ‘अँटी-सी वॉल’ बांधकाम थांबविण्याचा आदेश जारी केला आहे. ग्रामस्थांनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शवून ते ना विकास क्षेत्रात होत असून, वारसा क्षेत्राच्या मर्यादेत अतिक्रमण केले जात असल्याचा आरोप केला आहे. पंचायतीने स्पष्ट केले की, आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबंधित नोटीस आज, २२ ऑक्टोबर रोजी हणजूण-कायसूव पंचायतीच्या अधिकृत शिक्क्यासह जारी केली आहे.

‘आरजी’चे परब भ्रमिष्ट : मायकल लोबो

आमदार मायकल लोबो म्हणाले, की ‘आरजी’चे पक्षाध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) हे बऱ्याच काळानंतर सक्रिय झालेले नेते आहेत. ते गोव्याच्या लोकांना भ्रमिष्ट करण्याचे काम करीत आहेत. बार्देशसह हरमल ते केरीपर्यंत किनारी भागात अनेक दिल्लीस्थित बिल्डर लॉबीकडून बेकायदा बांधकामे सुरू आहेत; परंतु त्यांच्याविरोधात ब्र काढण्याची हिंमत परब यांच्यात नाही. माझ्यासारख्या स्थानिक व्यक्तीचे हणजुणेत कायदेशीर सुरू असलेले बांधकाम स्थानिक लोकांकरवी बंद पाडायला ते पुढे सरसावले आहेत.

दिलायला लोबोंकडून पोलिसांत तक्रार

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी या प्रकरणात जलसंपदा खात्याच्या कामात अडथळा आणून ते काम बंद पाडल्याप्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्रेवर आथाईत, रणजीत पार्सेकर, मायकल क्वेरीज, मॅक्सी डिसोझा, डेस्मंड आल्वारिस, ॲना फर्नांडिस, जावीश मोनी आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी हा एफआयआर तातडीने रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी खासगी हितसंबंधाने ही तक्रार केल्याचे नमूद करून आपण लोकांसोबत आहे. गरज असल्यास मोफत वकील म्हणून त्यांची बाजू मांडेन, असेही पालेकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yagneshwar Nigalye Passed Away: विनोदी, मिश्किल आणि कोटीबाज वाणी, दाभोळकरांच्या 'अंनिस'चा गोव्यात पाया रचणारे यज्ञेश्‍वर निगळ्ये वयाच्या 90 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड!

Goa Editorial: आता हद्द झाली...! संपादकीय

Goa Rain: पावसाचा धुमाकूळ कायम! पुढील चार दिवस गडगडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा

Mormugao Municipal Election: मुरगाव पालिका प्रभागवाढ ठरणार लक्षवेधी, विद्यमान नगरसेवकांच्या धावपळीला ब्रेक; आरक्षणावर अनेकांची नजर

Harmal Panchayat Issue: आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाची दुर्दशा! हरमलमधील भटवाडी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालक आणि ग्रामस्थ हैराण

SCROLL FOR NEXT