coronavirus4 
गोवा

धोका वाढतोय, आणखी चार बळी

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी : कोरोनाचा विषय अधिकच गंभीर होत चालला असून मंगळवारी आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. मृतांत आल्तिनो येथील २९ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७९ वर्षीय महिला, मडगाव येथील ५४ वर्षीय पुरुष आणि घोगळ मडगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या चौघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाल्याची माहिती देण्यात आली.

आजवर राज्यात एकूण ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत २५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर २३८ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. एकूण १९०१ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. तसेच चोवीस तासांत राजधानी पणजीत १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्‍याने लोकांत घबराट निर्माण झाली आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी १९ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ६७ जणांना ठेवण्यात आले. १८८३ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२९६ जणांचे अहवाल हाती आहेत. तर ५७० जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १२ रुग्ण आहेत.

डिचोलीत १२, साखळीत ५८, पेडणेत २६, वाळपईत ५८, म्हापसा येथे ६७, पणजीत ७८, बेतकीत २२, कांदोळीत ४५, कोलवाळ येथे ३७, खोर्लीत ३०, चिंबल येथे ९८, पर्वरीत ३८, कुडचडेत २६, काणकोणात ८, मडगावात ११४, वास्कोत ३८९, लोटलीत २४, मेरशीत २८, केपेत ३०, शिरोड्यात ३३, धारबांदोड्यात ३८, फोंडा ११४, नावेलीत ३७ रुग्ण आहेत.
 

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: स्‍मारक, मंदिरांचा विषय दुर्लक्षितच! सरकारला मिळेना जागा, प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया थंडावली

Mulgaon ESIC hospital: मुळगावात ईएसआय इस्पितळ उभारण्यास तानावडे आग्रही, उत्तर गोव्याच्या विमाधारकांना मिळेल मोठा दिलासा

Goa Comunidade Land: 'कोमुनिदादवरील घरे कायदेशीर'चे ते विधेयक तत्काळ रद्द करा! आमदार व्हिएगश यांची राज्‍यपालांकडे मागणी

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात! काणकोण येथील 'क्रीडा आंगण' सभागृहाचं सचिनच्या हस्ते होणार उद्घाटन

CM Rekha Gupta Attacked: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनता दरबार सुरु असताना घडला प्रकार; आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT