Damu Naik On ZP Election Dainik Gomantak
गोवा

'विकासासाठी पाठिंबा दिला तर अतिशयोक्ती नव्हे'! अपक्ष पालयेकरांबाबत दामूंची प्रतिक्रिया; विरोधकांनाही विकासाचा अधिकार असल्याचा दावा

Damu Naik: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे मांद्रेत अटल स्मृती संमेलनाला आले असता, त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले. यावेळी माजी आमदार दयानंद सोपटे सोबत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: विकासासाठी एखाद्या निवडून आलेल्या जिल्हा पंचायत सदस्याने सरकारला पाठिंबा दिला, अन् विकास कामे करून घेतली, तर त्यात काही अतिशयोक्ती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या झेडपी निवडणुकीत हरमल मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मनिषा कोरखणकर यांचा ५४ मतांनी अपक्ष उमेदवार राधिका पालयेकर यांनी पराभव केला. पालयेकर यांचे त्वरित मुख्यमंत्री सावंत यांनी स्वागत केले.

त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे मांद्रेत अटल स्मृती संमेलनाला आले असता, त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले. यावेळी माजी आमदार दयानंद सोपटे सोबत होते.

विरोधकांनाही विकासाचा अधिकार!

जे सरकारला पाठिंबा देतील त्यांचा पाठिंबा सरकार घेणारच. आणि विरोधी लोकप्रतिनिधींची कामे करू नये, असे कोणी सांगितले? असा सवाल दामू नाईक यांनी केला.विरोधी पक्षाचा उमेदवार जिंकून येतो. त्यालाही विकास करून घेण्याचा तेवढाच अधिकार असतो, असेही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाक लष्करप्रमुखाची आंतरराष्ट्रीय फजिती! असीम मुनीरला सुरक्षा रक्षकानं गेटवरच केलं 'क्लीन बोल्ड'; काय घडलं नेमकं?

एक 'क्लिक' करताच दीड लाख गायब! सायबर चोरट्यानं चिखलीतील ज्येष्ठ नागरिकाला लुटलं; क्रेडिट कार्डचं डिटेल्स देणं पडलं महागात

Bicholim Shop Fire: लॅपटॉप, संगणक अन् मशीन जळून राख; डिचोलीत ग्राफिक्सच्या दुकानाला भीषण आग, 'इतक्या' लाखांचे नुकसान

India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार

"व्हॅलेंटाइनवेळी गोव्याचे किनारे असे काही गजबजतात की, पाऊल ठेवायला जागा उरत नाही; प्रेमाचा बाजार आणि साहित्याचा ठणठण गोपाळ

SCROLL FOR NEXT