Pramod Sawant, Sadanand Tanavade, Damu Naik  Dainik Gomantak
गोवा

Damu Naik: कार्यकर्त्यांची भावना 'आपणच' प्रदेशाध्यक्ष झालो; अलोट गर्दीत दामू नाईक यांनी स्वीकारला पदभार

Goa BJP: निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी दामू यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

Sameer Panditrao

Goa BJP State President Damu Naik

पणजी: गेल्या दोन दिवसांत असंख्य कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवर साधलेला संपर्क आणि दामू प्रदेशाध्यक्ष म्हणजे आपणच प्रदेशाध्यक्ष झालो, अशी व्यक्त केलेली भावना हीच कामाची खरी मोठी पावती असल्याचे मनोगत व्यक्त करत माजी आमदार दामू नाईक यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

गोमंतक मराठी समाज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मावळते प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दामू यांना भाजप कार्यालयातील प्रदेशाध्यक्षांच्या कक्षात नेत स्थानापन्न केले.

निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी दामू यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी मंचावर मुख्यमंत्री, तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा, आमदार डॉ. दिव्या राणे, दिगंबर कामत, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, दाजी साळकर, रूडाॅल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर आणि मान्यवर उपस्थित होते. सूत्रनिवेदन माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केले, तर प्रेमानंद म्हांबरे यांनी आभार मानले.

कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सभागृहात पाय ठेवण्यास जागा नव्हती आणि त्यापेक्षा दुप्पट कार्यकर्ते सभागृहाबाहेर होते. इमारतीच्या गच्चीवर बसून कार्यक्रम बघण्याची-ऐकण्याची व्यवस्था करूनही ती अपुरी पडली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते इमारतीत मिळेल त्या ठिकाणी उभे राहिले. अनेकांना इमारतीबाहेर उभे राहावे लागले. कार्यकर्त्यांची गर्दी एवढी होती की, कार्यक्रम संपल्यावर दोनेक तास दामू यांना मंचावरच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी थांबावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT