Damodar Naik Dainik Gomantak
गोवा

Damodar Naik: दामू नाईकांनी कोणाच्या हातचे बाहुले होऊ नये

Goa Politics: एकदा सत्ता भोगली की घरी बसणे हा परतीचा प्रवास करावा लागणार ही कल्पना म्हणजे आमदारांची मधली सुट्टी.

गोमन्तक डिजिटल टीम

नीना नाईक

भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रदेशाची धुरा आता दामोदर नाईक यांच्याकडे आली आहे. दामोदर म्हणताना जरा अवघडल्यासारखे होते; कारण ‘दामू’ म्हणण्यात जो आपलेपणा आहे तो ‘दामोदरा’त नाही. सरळ आणि स्पष्ट बोलणारा. मनात ते ओठात हा स्वभाव. पाहिजे तेव्हा मवाळ हवा तेव्हा रोखठोक. त्याची झलक दाखवतो तो अधेमधे.

माझ्या मते दामूला असा काळ अध्यक्षपदाचा मिळाला आहे, जेथे भाजपने काही ‘कस्टोडियन’ पक्षात घेतले आहेत. जामीन मिळाला तर ते पक्षापासून लगेच काडीमोड घेतील. पक्ष, तत्त्व, यांचा ‘चेकमेट’ ते कधीही करू शकतात. आता ‘लेबल भाजप’, ‘झेंडा भाजप’ हे सगळे संभाळतात. या ‘चॅम्पियन’ना त्यांची ‘जिंकून येण्याची क्षमता’ या निकषावर तिकीट दिले गेले. हे गळाला लागलेले मासे पाण्यात सोडलेत. पण येनकेन प्रकारेण जर फूट पडणार हे ध्यानात आले, की घराणेशाही एक होणार. परत हक्क सांगणार.

गार्‍हाणे घालणार आणि मतदार परत ‘कस्टोेडियन’ होणार. कारण नोकरी दिली, ‘खाल्ल्या अन्नाला जागा’ हा फतवा ते काढणार. लोक मग भेटवस्तू म्हणून आपले मत यांच्या पदरात टाकणार. अरे, बाबांनो तुम्हांला हे कळत कसे नाही, तुम्ही तुमच्या हक्काची, तुमच्या स्किल्सची नोकरी करता; तुम्ही विकत घेतले कसे जाऊ शकता? ज्यांनी पैसे दिले ते कोर्टकचेरी करत आहेत. तर काहींना काही न करता पैसे परत मिळाले. एक आमदारदेखील पैसे घेतले म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलला आणि गडी पलटला.

मीडियाने दोन्ही घटना पारदर्शकपणे मांडल्या. इथे विशेष ‘पार्टी विथ डिफरन्स’ न म्हणता एका ताटात खाऊ उष्टे किंवा खरकटे ताटात ठेवून काही खाल्ले नाही हे जनतेला दाखवू, ही वृत्ती. हे स्टिकर रंग, रूप नसलेले पण तेव्हा जात, पात आणि पैसा या प्याद्यांचा वापर करून बुद्धिबळ खेळणार आणि गेम जिंकणार.

एकदा सत्ता भोगली की घरी बसणे हा परतीचा प्रवास करावा लागणार ही कल्पना म्हणजे आमदारांची मधली सुट्टी. मध्यांतर त्यांना मान्य नाही. कीव करावी की हेवा? असा विचार करणे म्हणजे आंब्याचे कलम लावून त्याला फणस कधी येतील हे विचारण्यासारखे आहे.

मधाचे पोळे पाहिले की मधमाशी खूप कष्टाने हे पोळे बनवते, पण तेच पोळे तुटत असेल तर डंख मारत सुजवते. तसेच हे मधमाशीचे कार्य मतदारांबरोबर होते. हे रंगारी कधी बेरंग करतील, कधी काय विकतील याचा नेम नाही. शेवटी ही ‘कस्टडी’, मालकी हक्क कुणावर दाखवणार?

दामूची हातोटी कसला लागणार. कुठल्या तारा जुळवायच्या, कुठल्या सटकल्या त्या एका सुरात होण्यासाठी धडपडायचे, ही कसरत सोपी नाही. तो उथळपणा त्यात नाही. पण सर्वांची तीन वर्षाची लसावि काढायला दामूला वेगवेगळे गॉगल घालावे लागणार. फोटोत झेंडे घेऊन पेपर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर छान दिसतात. त्या शपथा मक्याच्या तुऱ्यांना रंग देऊन केशर करून बाजारात विकल्या गेल्या. सगळे सत्य पुस्तकात गेले, ‘शॉर्ट मेमरी’ म्हणत.

बलात्कारी असो नाहीतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असोत, त्यांना पक्षाने ओढून, रेटून पक्षात आणले आणि त्यांची घुसमट केली. गडबड झाली की केसची ‘तारीख पे तारीख’ लावली. लटकती तलवार म्यान ठुसठुसली की काढा बाहेर. शेवटी मर्यादा आहेत. सप्तकाला नवे साद, नवे सुर येणार. बदल येणाऱ्या काळात घडतील त्यांचे संदर्भ स्वीकारावे लागतील. सुट्ट्या संपत चालल्या आहेत. शासक, सत्ता, ताकद यांची स्थिरता ४० ठरवणार की आयात केलेले १८ ठरवणार?

बागुलबुवा कुणाचा करायचा? बळी कुणाचा द्यायचा? आगपाखड कुणावर करायची? जवळीक कुणाशी करायची? झेंडे कुठे गाडायचे, कुठे लावायचे याचे प्राधान्य दामूने ठरवावे लागणार. फक्त त्याने कुणाच्या हातचे बाहुले बनू नये. अंधाराच्या गाडीत दामू आहे. बाकी मुद्दे गौण आहेत पण निर्णय आणि येणारी वेळ, बरीच कोडी सोडवेल. त्यातील राजकारण हे म्हणजे ‘खतरोंके खिलाडीं’चा खेळ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

POP Ganesh Idol Ban: पीओपी गणेशमूर्तींवर बंदी, पण कारवाईचे काय?

SCROLL FOR NEXT