दामोदर मावजो याना ज्ञानपीठ म्हणजे गोव्याबरोबर महाराष्ट्राचाही गौरव

 

Dainik Gomantak

गोवा

दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ म्हणजे गोव्याबरोबर महाराष्ट्राचाही गौरव

फा. फ्रान्सिस द ब्रिटो यांच्यावतीने आज मार्टिन्स यांनी खास वसई मुंबई येथून गोव्यात येऊन हा सत्कार केला

दैनिक गोमन्तक

मडगाव: यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) प्राप्त झालेले कोकणी (Konkan) साहित्यिक दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांनी कोकणी आणि मराठी साहित्त्यातील समन्वयाचा पूल उत्तमरीत्या बांधला आहे, त्यामुळे गोव्या (Goa) बरोबरच आम्हा महाराष्ट्रीयन (Maharashtra) साहित्यिकांना तो गोव्या बरोबरच महाराष्ट्राचाही गौरव वाटतो असे मत मराठी कवी सायमन मार्टिन्स यांनी आज माजोर्डा येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फा. फ्रान्सिस द ब्रिटो यांच्यावतीने आज मार्टिन्स यांनी खास वसई मुंबई येथून गोव्यात येऊन हा सत्कार केला. त्यांच्या बरोबर पायस कुतीन्हो हेही उपस्थित होते.

मार्टिन्स म्हणाले, मावजो यांच्या साहित्याचा महाराष्ट्रातही मोठा वाचकवर्ग आहे. एव्हढेच नव्हे तर दक्षिणायान अभियानाच्या माध्यमातून मावजो यांनी पुरोगामी विचारांच्या प्रचाराच्या चळवळीचे नेतृत्व केले आहे त्याचाही आम्हाला अभिमान आहे. खरे तर हा सत्कार फा. ब्रिटो याना स्वतः गोव्यात येऊन करायचा होता. मात्र ते आजारी असल्याने येऊ शकले नाहीत असे ते म्हणाले. या सत्काराला उत्तर देताना, फा. ब्रिटो यांच्यावतीने माझा सत्कार होणे हाच माझ्यासाठी अत्युच्च बहुमान असून मी हा सत्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT