Damodar Mauzo Dainik Gomantak
गोवा

Damodar Mauzo : सोशल मीडिया बनलाय आपला गुरु; दामोदर मावजो यांचे प्रतिपादन

‘ज्ञानपीठ’ मिळाल्याबद्दल नाशिक येथे नागरी सन्मान

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामसंस्कृती मागे पडली आहे. हुंडा पद्धतीने सर्व समाजांना ग्रासले आहे. मुलीच्या हितासाठी घर, गाडी घेऊन देण्याचा नवा फंडा पुढे आला असून मुलीबरोबरच घरात समृद्धी यावी, हा नवा विचार प्रबळ होत आहे.

दुसरीकडे कुटुंबातील आपसातील संवाद कमी होत असून सोशल मीडियाने आपल्या गुरूची जागा घेतली आहे, असे प्रतिपादन साहित्यिक दामोदर मावजो यांनी आज येथे केले.

शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेतील द. गें. खैरनार गुरुजी स्मृती व्याख्यानात ‘श्रेयस की प्रेयस'' या विषयावरील पुष्प गुंफले. कोकणी भाषेतील साहित्यासाठीचा 2022 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते मावजो यांचा नागरी सन्मान करण्यात आला.

मावजो यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन कवी राजू देसले यांनी केले असून नाट्य लेखक दत्ता पाटील यांनी त्याचे वाचन केले.

ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल मराठी भाषिकांनी कोकणी भाषेचा केलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञ आहे, असे सांगून मावजो म्हणाले, की सोशल मीडिया आपला गुरू बनला आहे. त्याने उच्छाद मांडला आहे. कुणाला काय पाहिजे, ते तो आपल्याजवळ आहे, असा सोशल मीडियाचा दावा आहे. त्याने सर्वांचा ताबा घेतला आहे.

त्याने मुलांच्या पालन पोषण्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच सध्याच्या वैश्विकरणाने आपण दूर होत आहोत. त्यामुळे ही परिस्थिती तयार झाली. शिवाय पैशाला महत्व आले आहे. चैन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्याचबरोबर अनेक बदलांचा आपण बदलांचा स्वीकार करतो. तडजोड करत स्वतःची फसवणूक करीत असतो.

वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर मुंबईतील जसलोक आणि लीलावती रुग्णालयाचे निवृत्त महाव्यवस्थापक प्रकाश म्हात्रे, शैला म्हात्रे, अनघा खलप, पुण्यातील सांस्कृतिक चळवळीचे सचिन इटकर, प्रायोजक वसंतराव खैरनार आदी उपस्थित होते.

व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा प्राचार्य संगीता बाफणा, उषा तांबे, हेमंत देवरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. व्याख्यानमालेचे माजी पदाधिकारी अरूण शेंदुर्णीकर, ॲड.अभिजीत बगदे, चिन्मय शौचे, धनपत अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या ४५ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘जय शारदे वागेश्‍वरी’ या प्रार्थनेवरील नृत्यास टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मुख्याध्यापिका मीनाक्षी कांगणे, शेख शबनम, नृत्य दिग्दर्शक राज अटक, संयोजक प्रदीप गोराडे यांचा गौरव करण्यात आला. हेमंत तुपे यांनी आभार मानले.

गोव्यात कोकणी, मराठीत सलोखा !

गोव्यात कोकणी अन मराठी अशा दोन भाषा गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इथे मराठी भाषा जुन्या काळापासून असून गोव्यातील अनेक साहित्यात त्याचा उल्लेख आहे.

तसेच कोकणी भाषेतील दोन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, असे सांगून ॲड. रमाकांत खलप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील एका मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले. फादर स्टीफन यांचे गोव्याच्या जडणघडणीतील योगदान त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT