Damodar Mauzo Dainik Gomantak
गोवा

आईने रोवली साहित्याची बीजे, इथेच 'या' कथांची पात्रे भेटली

माझे साहित्य जर कुणी सकस केले असेल तर ते या पसऱ्यानेच; दामोदर मावजो

दैनिक गोमन्तक

आपल्यात साहित्यिक बीजे आपल्या आईमुळे तयार झाली, असे मावजो सांगतात. लहान असताना त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. त्यातून त्यांच्यात वाचनाची गोडी तयार झाली. शाळेत गेल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना रामायणातील गोष्टी हे पुस्तक आणून दिले. त्यातून ही गोडी आणखी वाढली. ते शिकायला मडगावात यायचे. मडगाव (Margao) हे तर तेव्हाचे विद्येचे माहेरघर. या शहरात त्यांची दोस्ती वाचनालयाशी झाली. सुरूवातीला मराठीपुरते सीमित असलेले त्यांचे वाचन हिंदी, इंग्रजी असे वाढत गेले.

पसऱ्याचा फायदा

दामोदर मावजो (Damodar Mauzo) हे व्यवसायाने भुसारी दुकानदार. कोकणीत त्याला ‘पसरा’ असे म्हणतात. मावजो म्हणतात, माझे साहित्य जर कुणी सकस केले असेल तर ते या पसऱ्यानेच. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ते दुकानात असायचे. ते म्हणतात, मला माझ्या कथांची पात्रे या पसऱ्यावरच भेटली. मी माझ्या गावातच राहिल्याने गावाकडील नाळ कधीच तुटली नाही. माझ्या साहित्यात ख्रिस्ती फ्लेवर येण्याचे कारणही तेच. मी याच गावात माझ्या ख्रिस्ती मित्रांबरोबर फुटबॉल खेळलो. त्यांच्या बरोबर चर्चमध्येही गेलो. मी त्यांच्यापासून वेगळा असे कधी मला वाटलेच नाही. जसा मी माझ्या घरी दिवाळी साजरी करायचो तसेच त्यांच्याबरोबर ख्रिसमसही साजरा करायचो. त्यामुळेच त्यांचे विश्व हे माझेही विश्व होते. तेच माझ्या साहित्यातही उतरले.

दामोदर मावजो यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) म्हणजे संपूर्ण कोकणी समाजाचा आणि गोवा राज्याचा गौरव आहे. कोकणीला मिळालेला हा दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. त्‍यामुळे या भाषेचा पाया अधिकच बळकट झालेला आहे. कोकणीसाठी मावजो यांनी दिलेले योगदान मौलिक आहे. अस मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे.

दामोदर मावजो यांनी आपल्या साहित्यातून ख्रिश्चन समाजाचे प्रतिबिंब प्रबळरीत्या मांडले. ते प्रागतिक विचाराचे साहित्यिक असून आपली मते त्यांनी परखडपणे मांडली आहेत. त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्‍कार (Award) म्हणजे तमाम कोकणी समाजाला मिळालेला मोठा पुरस्‍कार आहे. अस मत साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT