wall collapses on bikes Dainik Gomantak
गोवा

काटे बायणा येथे भिंत कोसळल्याने 3 दुचाकींचे नुकसान

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्कोत जोरदार पावसामुळे अनेक ठीकाणी पडझड झाली. गटारे तूडूंब भरुन गटारातील पाणी भर रस्त्यावर वाहू लागले. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. तर काटे बायणा येथील सीवरेज प्लांटची भिंत जोरदार पावसाच्या तडाख्यात कोसळली. यात तीन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

आज झालेल्या जोरदार पावसामुळे वास्कोत जनजीवन विस्कळीत झाले. पहाटेपासून पावसाने वास्को शहराला झोडपून काढले. सतत चालू राहीलेल्या पावसामुळे संपूर्ण वास्को शहरात रस्त्यावर पाणी भरले. त्यामुळे वाहन चालकांना याचा भरपूर त्रास झाला.

दरम्यान जोरदार वृष्टीमुळे व्होळांत वाडे येथे घरावर माड पडून घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. सदर घटना सकाळी 11.30 वाजता घडली. तर आणखी एका घटनेत काटे बायणा येथील सीवरेज रिटेनिंग भिंत कोसळून यात तीन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भिंतीच्या शेजारीच रस्त्याच्या बाजूने मासेमारी व्यावसायिकांची घरे आहेत.

तसेच दाट लोकवस्ती असल्याने याठीकाणी लहान मुलें खेळतात बागडतात. तसेच वाहतूक रहदारी चालूच असते. दरम्यान सदर घटना घडली त्यावेळी जोरदार पाऊस चालू असल्याने लोक आपल्या घरात होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत नाही. परंतु घटनास्थळी उभ्या असलेल्या तीन दुचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिल्याने सुमारे 25 मीटर लांब इतकी रिटेनिंग भिंत रस्त्यावर आडवी झाली.

सदर भिंत लांब पल्याची असून उर्वरीत भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्याआधी उपाय योजना आखावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. तसेच सदर भिंत वीज खांबावरही धडकल्याने सदर वीज खांबही आडवा होण्याच्या मार्गावर आहे.

त्या वीज खांबापासूनही स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे. संबंधीत अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच वास्को पोलिसांनीही येऊन घटनेचा पंचनामा केला. संध्याकाळी सहा नंतर पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याने लोकांनी आपल्या घरचा रस्ता धरला. नंतर सात वाजता पावसाने पुन्हा जोर धरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT