वास्को: भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सरकार पंचायत निवडणुकासबंधी सर्वोच्च न्यायालयात जाणार असे काल विधान केले व आज सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली. यावरुन भाजपची सरकारच्या प्रशासनात ढवळाढवळ चालू असल्याचे स्पष्ट होत असुन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे बाहुले असल्याचे उघड झाले आहे. अशी टिका कॉंग्रेसचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे. (MLA Sankalp Amonkar criticizes Chief Minister Pramod Sawant )
भाजप प्रशासनाचा वापर केवळ आपल्या राजकीय सोयीसाठी करीत आहे. भाजप लोकशाही व घटनेची हत्या करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आहे. भाजप अध्यक्षांच्या दबावाखालीच सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कायदेशीर बाबींवर ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेणे सरकारवर बंधनकारक आहे. परंतु, दोन दिवसांमागेच ॲड. देविदास पांगम यांनी सरकार उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर मग दोन दिवसात काय बदलले? असा सवाल संकल्प आमोणकर यांनी विचारला.
ओबिसी व बहुजन समाजाला प्रतिनिधीत्व देण्यास कॉंग्रेस पक्ष नेहमीच वचनबद्ध असुन, केवळ भाजपच्या अनागोंदी कारभाराने ओबिसी आरक्षणाचा घोळ झाला. न्यायालयीन लढ्यांवर भाजप पदाधिकारी वकीलांकडुन कमिशन घेत असावेत असा टोला संकल्प आमोणकर यांनी मारला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचा प्रशासनावरील ताबा पुर्णपणे गेला असुन, आज त्यांचे मंत्रीमंडळ सहकारी एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. गोव्यात आज अनागोंदी माजली आहे असे आमोणकर शेवटी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.