Goa Dams Dainik Gomantak
गोवा

Goa Dams: 14 नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी; धारबांदोड्यात दोन नवी धरणं- सुभाष शिरोडकर

धारबांदोडा येथील काजूमळ आणि तातोडी येथे दोन लहान धरणं उभारली जाणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

धरणातील पाणी शेतीकामासाठी 14 नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. तसेच, धारबांदोड्यात दोन लहान नवी धरणं बांधली जाणार असून, याचे लवकरच काम सुरू होईल असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

गोव्यातील धरणांचे पाणी शेतीकामासाठी 14 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून दिले जाईल. पिण्याच्या पाण्याची कमतरता अजिबात भासणार नाही. तसेच, धारबांदोडा येथील काजूमळ आणि तातोडी येथे दोन लहान धरणं उभारली जाणार आहेत. यासाठी लवकरच काम सुरू होईल. याशिवाय चरावणे, सत्तरी येथील धरणही लवकरच पूर्ण होईल. अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्यात गोव्यातील सहा धरणांमधून पाणी सोडले जाईल असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले होते. मात्र, शिरोडकर यांनी सांगे व केपे भागात भेट दिली असता येथील शेतकऱ्यांनी त्यांना लवकर पाणी सोडण्याची विनंती केली. दरम्यान, धरणांमध्ये पुष्कळ पाणी असल्याचे शिरोडकर म्हणाले आहेत.

गोव्यातील सात तालुके शेतीवर अवलंबून आहेत, जवळपास आठ हजार शेतकरी शेती करतात. कोरोना नंतर अनेक युवा देखील शेतीकडे वळाले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आपल्याला प्रामुख्याने पिण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागेल. महाराष्ट्र सरकार तिलारी कॅनालची दुरूस्ती करणार असल्याने आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल असे शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT