Water Issues Dainik Gomantak
गोवा

Water Issues: मोयरा येथे बंधाऱ्याला पुन्हा भगदाड, क्षारयुक्त पाण्याने पिकांचे नुकसान

मोयारा येथील बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले असून खारे पाणी घुसल्यामुळे शेत जमीन व भाजी पिकांचे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोयारा येथील बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले असून खारे पाणी घुसल्यामुळे शेत जमीन व भाजी पिकांचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी जलस्रोत मंत्र्यांची मदत घेण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे.

नदीच्या पाण्यापासून मोयारातील शेत जमिनीचे संरक्षण या बंधाऱ्यामुळे होते. परंतु हा बंधारा आता कमकुवत बनला आहे. बंधाऱ्याला विविध ठिकाणी वारंवार भगदाड पडत असल्याने नदीचे खारे पाणी शेतात घुसते. सध्या शेतीत हे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमीन बाधित झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आताफोंड असोसिएशनने तीन किलोमीटरचा हा बंधाऱ्याचा भाग साफ करण्याचे काम हाती घेतले आहे आणि त्याची दुरुस्ती केली. तरीही वारंवार भगदाडे पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे कठीण बनले आहे. परिणामी पीक खराब होत आहे. हा भगदाड पडलेला बंधारा दुरूस्तीकडे प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही आता जलस्त्रोत मंत्र्यांकडे दाद मागण्याची निर्णय घेतला आहे, अशी माहिती टेनंट असोसिएशनचे अध्यक्ष फिलीप डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT