Swapnil Chindarkar  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Accident: दुर्दैवी! दाबोळी उड्डाण पुलावरून बॅरिकेड कोसळून वीज कर्मचारी ठार; क्रेनचालक पोलिसांच्या ताब्यात

Dabolim flyover accident: दाबोळी येथे उड्डाण पुलाच्या कामाचा लोखंडी बॅरिकेड दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील चिंदरकर या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim Flyover barricade accident

वास्को: दाबोळी येथे उड्डाण पुलाच्या कामाचा लोखंडी बॅरिकेड दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील चिंदरकर (वय ३०, हेडलँड - सडा) या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. उड्डाण पुलावर कामाच्या ठिकाणी क्रेनने बॅरिकेडला धडक दिल्याने बॅरिकेड चालत्या स्कूटरवर पडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

स्वप्नील चिंदरकर यांना तातडीने चिखली येथील इस्पितळात हलवण्यात आले, परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. क्रेनचालक चंद्रशेखर प्रसाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्वप्नील चिंदरकर हे मंगळवारी आपले काम संपवून दुचाकीने सडा येथे निघाले होते. त्यावेळी रस्त्यावर अचानक लोखंडी बॅरिकेड त्यांच्या दुचाकीवर पडले. तेथे उपस्थितांनी बॅरिकेड हटवून त्याखाली सापडलेल्या स्वप्नील यांना बाहेर काढले व उपचारार्थ इस्पितळात हलविले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, त्यावेळी जेसीबीद्वारे कोणतेही काम सुरू नव्हते. त्या बॅरिकेडवर दुचाकीची धडक बसली असावी. त्यामुळे ते बॅरिकेड स्वप्नीलच्या दुचाकीवर कोसळल्याचा दावा कंत्राटदाराच्या एका अधिकाऱ्याने केला.

तथापी, जर स्वप्नील यांची दुचाकी त्या बॅरिकेडवर धडकली, तर बॅरिकेड आतल्या बाजूस पडायला होते. ते रस्त्याच्या बाजूला कसे पडले? असा सवाल त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केला. या अपघात प्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा केला.

योग्य खबरदारी न घेतल्याने दुर्घटना

सध्या एमईएस चौक ते दाबोळी बोगमाळो चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. तेथे खोदकाम सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी अवजड लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. तथापी, ते बॅरिकेड्स रस्त्यावर आडवे पडू नयेत यासाठी म्हणावी तशी खबरदारी घेण्यात आलेली नाही. बॅरिकेडला चार पाच सिमेंट काँक्रींटच्या लाद्यांचा आधार देण्यात आला आहे. हा आधार तकलादू असल्याचे आज घडलेल्या अपघातामुळे स्पष्ट झाले.

काळाचा घाला

स्वप्नील चिंदरकर यांचा गेल्या वर्षी १७ मार्चला विवाह झाला होता. या महिन्यात त्यांच्या विवाहाचा वाढदिवस होता. तत्पूर्वी मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या मागे आई, वडिल, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT