CM Pramod Sawant Statement on Mopa and Dabolim Airport Goa
CM Pramod Sawant Statement on Mopa and Dabolim Airport Goa  Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच राहणार : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

आज पासून गोव्याचे विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आणि सरकारमधील गोव्यातील महत्त्वाचे प्रश्न घेऊन अनेक चर्चा सुरू होत्या. यादरम्यान काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी भाजप सरकारला गोव्यात सुरू होऊ घातलेल्या मोपा विमानतळाबद्दल प्रश्न केला. ते म्हणाले की, 'मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होणार का?

यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, दाबोळी विमानतळाचे कामकाज बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरूच राहणार. मोपामुळे राज्यात दररोज 150 विमाने उतरतील.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबो यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र आता आपण सभापती रमेश तवडकर यांना सादर केले आहे. दुपारपर्यंत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल आणि ती माहितीही सभापतींना सादर केली जाईल, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Devi Jatra 2024 : श्री लईराई देवीच्या दर्शनासाठी शिरगावात गर्दी

Lairai Devi Jatra 2024 : शिरगावात ‘गोबी’ला बंदी; मात्र अस्नोड्यात थाटले स्टॉल्‍स

Crime News : शिकारीचा नाद भोवला; कदंबचे १६ कर्मचारी अटकेत

OCI Card Issue : ओसीआय कार्डप्रकरणी भाजपने फसविले : युरी आलेमाव

Goa Police : गोवा पोलिसांची विश्वासार्हता वेशीवर; पोलिसानेच पुरवली गुन्हेगारांना माहिती

SCROLL FOR NEXT