Dabolim Airport Touts Issue Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport Touts Issue: टाऊट्‌सनी आमचं जगणं मुश्कील केलयं, त्यांचा बंदोबस्त करा... टॅक्सीमेन असोसिएशनचं पोलिसांकडं गाह्राणं

United Taxi Men Association Goa: दाबोळी विमानतळावरील टाऊट्‌सचा बंदोबस्त केला नाही, तर यापुढे आम्ही तुमच्याकडे येणार नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने लढा देत आहोत.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: दाबोळी विमानतळावरील टाऊट्‌सचा बंदोबस्त केला नाही, तर यापुढे आम्ही तुमच्याकडे येणार नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने लढा देत आहोत. परंतु जर एखादी बरीवाईट घटना घडली, तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल, असा इशारा दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकातील पोलिसांना शुक्रवारी (ता.२४) दिला. टाऊट्‌सप्रकरणी आपण दखल घेऊ, असे आश्वासन पोलिस निरीक्षक अरुण बाक्रे यांनी दिले आहे.

दाबोळी विमानतळावर युनाटेड टॅक्सीमेन असोसिएशनचा काऊंटर आहे. या संघटनेचे सुमारे ३५० सदस्य आहेत. या सर्वांच्या व्यवसायाला (Business) टाऊट्‌सचे ग्रहण लागले आहे. टाऊट्‌समुळे टॅक्सी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय टाऊट्‌सकडून वेळप्रसंगी टॅक्सीवाल्यांना मारहाण केली जाते. या टाऊट्‌समुळे वैतागलेल्या टॅक्सीवाल्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील काहीजणांनी एकत्र येऊन दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकावर मोर्चा नेला. यावेळी पोलिस निरीक्षक बाक्रे मोर्चाला सामोरे गेले. तेव्हा टॅक्वीवाल्यांनी आपली कैफियत मांडली.

व्यवसायावर झाला परिणाम

शैलेश मयेकर यांनी टाऊट्‌समुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले. आमच्या कमिटीच्या सदस्यांनाही त्या टाऊट्‌सनी मारहाण केली होती. याप्रकरणी दखल घेताना वाहतूकमंत्र्यांनी पोलिस (Police) अधिकाऱ्यांना हा प्रकार बंद झाला पाहिजे, अशी सूचना केली होती. त्यामुळे टाऊट्‌स कमी झाले होते; परंतु आता ते टाऊट्‌स पुन्हा उगवले आहेत, त्यामुळे सध्या आमचा व्यवसाय कमी झाला आहे.

आमचे जगणे मुश्कील

संघटनेचे सरचिटणीस प्रसाद प्रभूगावकर यांनी सांगितले, आम्ही पोलिसांकडून आश्वासन घेण्यासाठी पोटतिडकीने मोर्चा घेऊन आलो आहोत. यापूर्वी आम्ही १०-१५ वेळा निवेदने, पत्रे दिली. या टाऊट्‌सनी आमचे जगणे मुश्कील केले आहे. पूर्वी आम्हाला तीन-चार फेऱ्या मिळत होत्या; परंतु आता एक फेरी मिळणेही कठीण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

Canacona: युवा पिढीसाठी गोकर्ण पर्तगाळी मठात ॲम्‍फी थिएटर, युवकांना करणार आकर्षित; 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामांची पूर्तता

Baina Vasco Robbery Case: बायणा प्रकरणात दरोडेखोरांना फ्लॅटची इत्थंभूत माहिती कशी? मागच्या वाटेने, लिफ्टने, थेट नायक यांच्‍याच बेडरूमपर्यंत गेलेच कसे?

Zuarinagar: झुआरीनगरात उसळला आगडोंब, भंगारअड्डे भस्मसात; 'अग्निशमन'चे शर्थीचे प्रयत्न, हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक

Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

SCROLL FOR NEXT