Vasco Hit and run case accused Dainik Gomantak
गोवा

Goa Hit and Run Case : दाबोळीत 'हिट अँड रन'; कारच्या धडकेत विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू

धडक देणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घतले आहे.

Rajat Sawant

Dabolim Hit and Run Case : दाबोळी येथे एक 'हिट अँड रन'चा प्रकार समोर आला आहे. या अपघातात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचले. धडक देणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घतले आहे.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही 'हिट अँड रन'ची घटना शुक्रवारी रात्री घडली. रस्त्याने जाणाऱ्या दाबोळी विमानतळावरील कर्मचाऱ्याला रात्री कारची धडक बसली. निखील शाजू (23) असे त्या युवकाचे नाव असून तो केरळा येथील आहे. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. तर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला.

पहाटे तेथून जाणाऱ्या एका विमानतळावरील कर्मचाऱ्याने निखील याला पाहिले व याबाबतची पोलिसांना कल्पना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निखीलला चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू होता.

पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करताना कारची पुढील नंबरप्लेट अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत मिळाली. पोलिसांनी त्याच्या आधारे तपास राबवित कारचालकाला अटक केली. संदिप मालवणकर (38) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

SCROLL FOR NEXT