Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: ‘दाबोळी’ला गतवैभव मिळवून देणार! विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत कॅप्टन विरियातोंचा निर्धार

Viriato Fernandes: दाबोळी विमानतळासाठी जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

Sameer Panditrao

Viriato Fernandes About Dabolim Airport

वास्को: येथील दाबोळी विमानतळ सल्लागार समितीचे नवीन सदस्य दाबोळी विमानतळाला पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त व्हावे, तसेच दाबोळी विमानतळाचे नाव पुन्हा जगभर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

नवीन सदस्य दाबोळी विमानतळाला पुन्हा पहिल्या स्थानावर आणण्यासाठी आपल्या नवीन कल्पना अंमलात आणतील यात शंकाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दाबोळी विमानतळ सल्लागार समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य यांची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला दाबोळी विमानतळाचे संचालक जॉर्ज वर्गिस ,मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी, नवीन सदस्य सर्वेश्वर धोंड, ब्लैझ कॉस्ताबीर, ओर्विल दोरादो रॉड्रिग्ज, जयेश शेटगावकर, नंदादीप राऊत तसेच पोलिस अधिकारी, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाचे , भारतीय विमानतळ प्राधिकरण, एअरलाईन्स ऑपरेटर इत्यादीचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रकरणी कॅप्टन फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही महत्वाची माहिती दिली. दाबोळी विमानतळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात आल्याचे ते म्हणाले. दाबोळी विमानतळ पूर्वी संपूर्ण जगात प्रसिध्द होता. तथापि काही कारणास्तव या विमानतळाचे नाव गेल्या काही वर्षापासून दूर गेले आहे.

येथे देशभरातून तसेच जगभरातून पर्यटक येतात. त्यांच्या ओठी दाबोळी विमानतळाचे नाव व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी समितीच्या अनुभवी अशा सदस्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या विमानतळावर अधिकाअधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत. ज्या गैरसोयी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या विमानतळावर अधिकाअधिक विमान ऑपरेटरांनी आपली विमाने आणावीत यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.

‘युझर्स डेव्हलपमेंट फी’वर चर्चा करू!

‘युझर्स डेव्हेलपमेंट फी’ संबंधी चर्चा करण्यात येईल. यासंबंधी ऑपरेटरांचे मत काय आहे हे विचारात घेतले जाईल. त्यांना दाबोळी विमानतळावर आकर्षित करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

काही विमाने ‘युझर्स डेव्हलपमेंट फी’ मुळे

दुसरीकडे वळली आहेत, यासंबंधी आपणास कल्पना आहे. त्यामागील कारणही शोधले जाईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

Redmi Smartphone: आता फोन चार्जिंगचं नो टेन्शन, रेडमी लॉन्च करणार 9000 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

Gym Viral Video: ठुकरा के मेरा प्यार... जिममध्ये गाणं वाजताच मुलाचा वर्कआउट मोड ऑन, लोक म्हणाले, 'भाऊचा कमबॅक पक्का'

India's 2nd Biggest Stadium: देशातील दुसरं सर्वात मोठं स्टेडियम उभारलं जाणार; खर्च तब्बल 1650 कोटी, सरकारने केली घोषणा

SCROLL FOR NEXT