Shiroda Leopard, Goa Leopard Dainik Gomatnak
गोवा

Leopard Attack: 2 बिबट्यांनी पाडला 4 कुत्र्यांचा फडशा; शिरोड्यात दहशत, रात्रीच्या डरकाळ्यांनी नागरिक भयभीत

Goa Leopard Attack: परिसरातील नागरिकांच्या चार कुत्र्यांचा फडशाही या बिबट्यांनी पाडलेला आहे. बिबट्यांच्या भीतीने अनेक लोक रात्री घराबाहेर पडण्यास घाबरतात.

Sameer Panditrao

शिरोडा: बरबट, दाबोली - शिरोडा परिसरात दोन बिबट्यांची दहशत वाढली असून या बिबट्यांनी चार कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरोडा पंचायत क्षेत्रातील ग्रामीण व दुर्गम अशा बरबट - दाबोली रानात दोन बिबट्यांचा संचार वाढलेला आहे.

हे बिबटे रात्रीच्या वेळी डरकाळ्या फोडतात. तसेच त्यांचा संचार वस्तीतूनही असतो. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील नागरिकांच्या चार कुत्र्यांचा फडशाही या बिबट्यांनी पाडलेला आहे. बिबट्यांच्या भीतीने अनेक लोक रात्री घराबाहेर पडण्यास घाबरतात. वन खात्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

गोव्यात अनेक परिसरात बिबटया मानवी वस्तीत घुसण्याचा घटना घडत आहेत. वाढती बांधकामे, वृक्षतोड या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत.

इतर प्राणी

बिबट्यासोबतच अस्वले, गवे, माकडे यांचे लोकवस्तीत घुसण्याचा प्रमाण वाढले आहे, मानव- वन्यप्राणी संघर्षाकडे आता गांभीर्याने बघायची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bethora: '..आम्हाला आंघोळ करणेही अशक्य'! बेतोडा भागात पाणीबाणी; टंचाईमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल

Arambol: हरमल-भटवाडीत आंदोलन पेटले! ‘झोन’ बदलाचा वाद ऐरणीवर, जमीन विक्री थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांचे निवेदन

IFFI 2025: 'इफ्फीत मी पहिल्यांदाच आली आहे'! अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा हटके अंदाज; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सिनेमाचे होणार स्क्रीनिंग

Goa Crime: 75 वर्षांचे गुन्हेगार, 6 गुन्हे दाखल; गोवा खंडपीठाकडून ‘हिस्ट्री शीट’ उघडण्याचा पोलिसांचा आदेश रद्द, वाचा प्रकरण..

Shri Ram Digvijay Yatra: 'माझ्या मागे श्री रामाचे बळ'! बद्रीनाथ ते काणकोणपर्यंत श्रीराम दिग्विजय रथाचा प्रवास; चालकाचे 8000 किमी सारथ्य

SCROLL FOR NEXT