Cyber Fraud Dainik Gomantak
गोवा

Cyber Fraud: 'सीझेडएमए'चा अधिकारी असल्याचं सांगत 1.49 लाखांची फसवणूक, आसोळणातील व्यक्तीला गंडा; बुधवारी एका दिवसात सायबर ठगांचा 5 जणांवर वार

Goa Cyber Fraud: किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचा (सीझेडएमए) अधिकारी असल्याचे भासवून आसोळणा येथील एका व्यक्तीची १.४९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचा (सीझेडएमए) अधिकारी असल्याचे भासवून आसोळणा येथील एका व्यक्तीची १.४९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. दरम्यान, राज्यात दिवसभरात सायबर फसवणुकीच्या पाच घटना उघडकीस आल्या असून, पाच जणांना तब्बल ११.९५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

गोमंतकीयांनी सायबर फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी राज्य सरकारकडून विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. तरीही, आमिषाला बळी पडून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार सुरूच आहेत. राज्यात नव्याने उघडकीस आलेल्या पाच प्रकरणांत सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पाच जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

पहिल्या प्रकरणात, ९ जून रोजी मडगावातील एका महिलेला सायबर भामट्याने एपीके फाइल डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले. ती फाइल डाऊनलोड केल्यानंतर तिच्या मोबाईल फोनमधील संपूर्ण माहिती संशयिताच्या हाती लागली. त्यानंतर संबंधित महिलेच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर काही संदेश आले. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर नेट बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून तिच्या बँक खात्यातून पाच अनधिकृत व्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यातून सुमारे ६.५१ लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली.

दुसऱ्या प्रकरणात, किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचा (सीझेडएमए) अधिकारी असल्याचे भासवून आसोळणा येथील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. पीडित व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २७ जुलै रोजी त्यांना एका व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला. त्याने आपण ‘सीझेडएमए’चा अधिकारी असल्याचे सांगत, तक्रारदाराच्या व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवून देण्याच्या बहाण्याने पैसे मागितले.

त्यानुसार तक्रारदाराने संशयिताच्या बँक खात्यांत ऑनलाइन पद्धतीने सुमारे १.४९ लाख रुपये हस्तांतरित केले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

तिसऱ्या प्रकरणात, ‘ओएनजीसी’मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी सारझोरा येथील एका महिलेची सुमारे १.०६ लाख रुपयांची फसवणूक केली. ‘ओएनजीसी’तील रिक्त पदांसाठी अर्ज मागविणारी वर्तमानपत्रातील जाहिरात पाहिल्यानंतर संबंधित महिलेने जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळावर आपला ई-मेल आयडी आणि व्हॉट्सॲप क्रमांक नोंदविला. त्यानंतर ‘ओएनजीसी’चा प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीचा तिला फोन आला.

त्याने नोकरीचे आश्वासन देत तिला विविध कारणांसाठी पैसे भरण्यास प्रवृत्त केले. ऑफर खरी असल्याचे समजून संबंधित महिलेने संशयिताने दिलेल्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने सुमारे १.०६ लाख रुपये हस्तांतरित केले. मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

क्रेडिट कार्ड मर्यादेचे आमिष अंगलट!

‘एसबीआय’चा क्रेडिट कार्ड अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने सांगे येथील एका महिलेची १.४७ लाख रुपयांची फसवणूक केली. २८ जुलै रोजी तिला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने तिच्या क्रेडिट कार्डची मर्यादा २.१४ लाख रुपयांवरून ३.१४ लाख रुपयांपर्यंत वाढवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिची फसवणूक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Reality Hit Me'! 3 कोटींचा व्हिला, 45 हजार रुपये भाड्याचं स्वप्न; पण प्रत्यक्षात मिळतायत फक्त 11 हजार! गोव्यातील प्रॉपर्टीबाबत अभिनेत्री पारुल गुलाटीचा खुलासा

Assagao: आसगावातील जलप्रदूषण; झऱ्याभोवतालची बांधकामे स्कॅनरखाली, कोर्टाचे यंत्रणांना पाहणीचे निर्देश

"देशासाठी खेळण्यापेक्षा खिसा भरण्यावर भर", पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वृत्तीवर संताप व्यक्त करत दिग्गजानं सुनावले खडे बोल

Justice Yashwant Varma: घरातील बेहिशेबी पैसा न्या. यशवंत वर्मा यांचाच, चौकशी समितीचा अहवाल संसदेत सादर

Mopa Airport Toll: मोपा टोलला पुढील वर्षापर्यंत 'ब्रेक', मंत्री कामत यांची नितीन गडकरींशी बोलणी; दिल्ली दौऱ्यात चार मंत्र्यांच्या भेटी

SCROLL FOR NEXT