SP Rahul Gupta, DGP Alok Kumar Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: धक्कादायक! ‘सायबर’ठगांकडून गोमंतकीयांना 9 कोटींचा गंडा; 53 गुन्ह्यांची नोंद

Goa Cyber ​​Crime Cell: गोव्यात यावर्षी ५३ सायबर गुन्हे नोंद झाले असून ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. गोवा सायबर क्राईम कक्षाने केलेल्या तपासातून ऑक्टोबरपर्यंत ९ कोटींची फसवेगिरी झाल्याची माहिती समोर आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Cyber Crime Rate Goa Police Press Conference

पणजी: देशात सायबर क्राईम घोटाळे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकजण ऑलनाईन व्यवहाराच्या फसवेगिरीला बळी पडत आहेत. गोव्यातही यावर्षी ५३ सायबर गुन्हे नोंद झाले असून ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. गोवा सायबर क्राईम कक्षाने केलेल्या तपासातून ऑक्टोबरपर्यंत ९ कोटींची फसवेगिरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशात गोवा पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासकामात ५ व्या स्थानावर आहे. या सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृतीसाठी गोवा पोलिसांनी अधिक भर दिला आहे. गोव्यातील व्यक्ती या सायबर गुन्हेगारांना बळी पडू नयेत, यासाठी राज्यभर जनजागृतीची मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.

राज्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे गोवा पोलिस सायबर कक्षातील पोलिस कर्मचाऱ्यांची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या कक्षात पोलिस निरीक्षकासह २६ कर्मचारी होते ती संख्या आता ४७ करण्यात आली आहे.

गोवा सरकारने एक पोलिस उपनिरीक्षक कायमस्वरुपी दिल्लीत तैनात केला आहे, सुमारे ‘राज्य सुरक्षित गोंय’ मोहिमेअंतर्गत जागृती सुरू आहे. फसवणूक केलेले १५२ मोबाईल क्रमांक बंद केले. एस्कॉर्ट साईट बंदची शिफारस केली आहे, असे कुमार यांनी सांगितले.

या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासंदर्भातची माहिती शिक्षण खात्याच्या सहाय्याने सुमारे ५०० संगणक शिक्षकांना देण्यात आली आहे. जनजागृती राज्याच्या कानकोपऱ्यात करण्यासाठी १६७ महाविद्यालयीन स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्याची जागृती करतील. सुमारे १२० हून अधिक पंचायतीच्या सरपंचांना माहिती देण्यात आली. ही माहिती सरपंचांनी ग्रामसभेतून लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीपार्ड व जीईडीसीमार्फत सरकारी अधिकाऱ्यांना सायबर कक्ष अधिकाऱ्यांचे एक विशेष सत्र ठेवून माहिती दिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT