Corjuem WhatsApp Hacking Case Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: ओळखीच्या व्यक्तीकडून आला मेसेज अन् 90 वर्षीय महिलेचं व्हॉट्सॲप हॅक

Corjuem WhatsApp Hacking Case: मार्था परेरा नावाच्या खोर्जुव्यातील वयस्क महिलेला 2 डिसेंबर रोजी फसवे संदेश पाठवून तिचे व्हॉट्सॲप खाते हॅक करण्यात आले

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यात सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हापशातील एका ९० वर्षीय महिलेसोबत देखील असाच एक गंभीर प्रकार घडला. मार्था परेरा नावाच्या खोर्जुव्यातील वयस्क महिलेला 2 डिसेंबर रोजी फसवे संदेश पाठवून तिचे व्हॉट्सॲप खाते हॅक करण्यात आले होते.

मार्था हिने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिला व्हॉट्सॲपवर मदत मागणारा एक संदेश आला. तिला समोरच्या व्यक्तीने तिने पाठवलेला नंबर पुन्हा पाठवायला सांगितलं आणि यानंतर मात्र मार्थाचा व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याचे लक्ष्यात आले आणि मार्थाने त्वरित तिचा अकाउंट अनिंसटॉल केला.

मार्थाला तिच्याच एका परिचित व्यतीच्या नावे हा संदेश आला असल्याने तिने देखील मदत करण्यास होकार दिला, मात्र यानंतर होणारा प्रकार तिला काहीसा संशयास्पद वाटू लागला.

मार्थाने दिलेल्या माहितीप्रमाणे यानंतर तिला अनेक परिचित माणसांचे तू आमच्याकडे का मदत मागतेयस असे संदेश आणि फोन येऊ लागले, फक्त गोव्यातूनच नाही तर परदेशातील परिचितांकडून सुद्धा मार्थाला लोकं नेमकी कोणती मदत हवीये असा प्रश्न विचारणारे कॉल्स करू लागले .

काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी मार्थाची मदत केली असून गोवा पोलिसांकडे याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. कार्लोस फेरेरा यांनी सर्वांना अशा गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT