Goa Police on Cyber Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: गोलमाल है! गोव्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये गमावले तब्बल *0* कोटी रुपये, वाचा पोलिसांनी काय सांगितले?

Cyber Crime in Goa: सायबर क्राईमच्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी गोवा पोलीस प्रशासनाने सध्या जनजागृतीवर भर दिला आहे

Akshata Chhatre

Cyber Crime News: राज्यात वाढलेल्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी गोवा पोलीस प्रशासनाने सध्या जनजागृतीवर भर दिला आहे. गेल्या वर्षभरात सायबर गुन्ह्यांद्वारे राज्यात एकूण १०१ कोटी रुपयांची फसवणूक झालीये आणि तक्रार केलेल्या लोकांना मदत करत १० कोटी रुपये वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) रोजी झालेल्या कार्यक्रमात बोलताना पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर बिरादार यांनी राज्यातील सायबर गुन्हे आणि पोलिसांनी केलेली उपाययोजना यावर भर दिला आणि अशा फसवणुकीला बळी पडत असल्यास १९३० क्रमांकावर संपर्क करून मदत मिळवावी असे आवाहन केले आहे. याशिवाय तक्रारदार स्थानिक पोलीस स्थानकात संपर्क करू शकतात किंवा एनसीआरपी पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, ९९ टक्के गुन्हे हे डिजिटल उपकरणांचा वापर करून केले गेलेत. फसवणूक करणारी लोकं पैशांची भलीमोठी रक्कम घेऊन ती वेगवेगळ्या खात्यांमध्ये हलवतात, आणि वेळीच या गुन्ह्यांची नोंद झाल्यास पोलिसांना ती खाती गोठवता येतात आणि परिणामी आर्थिक नुकसान होत नाही.

राज्यात गेल्यावर्षभरात सायबर गुन्ह्यांमधून गोव्यातील लोकांची १०१ कोटी २६ लाख एवढी मोठी फसवणूक झालीये, मात्र ताबडतोब तक्रार नोंदवलेल्या लोकांची मदत देखील पोलिसांकडून केली गेलीये. पोलिसांनी १० कोटी ७५ हजार ६७१ रुपये वाचवण्यात यश मिळवले आहे मात्र तरीही हे गुन्हे थांबण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी आता जनजागृतीवर भर दिलाय.

बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) दक्षिण गोव्यातील ४४ ठिकाणी सायबर क्राईमबाबत माहितीपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली, यांमध्ये राक्षचालक, बसचालक, विद्यार्थी, वयोवृद्ध,विमानतळ, रेल्वे स्थानक परिसर आणि इतर ठिकाणच्या लोकांचा समावेश होता. गोव्यातील जनतेने सतर्क राहावे आणि सायबर गुन्ह्यांवर मात करणं सोपं होईल असं पोलीस म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT